विमा/कर्ज

73 लाखांहून अधिक पेन्शनधारकांच्या बँक खात्यांमध्ये एकाच वेळी रक्कम!

business batmya

देशातील सेवानिवृत्ती वेतनधारकांना आनंदाची बातमी आहे. त्यांच्या खात्यात लवकरच पैसा येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना 29 आणि 30 जुलै रोजी होणार्‍या बैठकीत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार करेल आणि त्याला मंजुरी देण्याची शक्यता आहे.

त्यामुळे देशातील 73 लाखांहून अधिक पेन्शनधारकांच्या बँक खात्यांमध्ये एकाच वेळी रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

सध्या, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ची 138 हून अधिक प्रादेशिक कार्यालये लाभार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रातील स्वतंत्रपणे पेन्शन वितरित करतात. त्यामुळे विविध क्षेत्रीय कार्यालयातील पेन्शनधारकांना वेगवेगळ्या वेळी किंवा एखाद्या दिवसात पेन्शन मिळते. देशातील 138 पेक्षा जास्त प्रादेशिक कार्यालयांच्या केंद्रीय डेटाबेसचा वापर करून पेन्शनचे वितरण केले जाईल आणि यामुळे एकाच वेळी 73 लाखाहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये लाभ जमा करणे सुलभ होणार आहे. याविषयीचा निर्णय या महिन्याच्या अखेरीस होणार आहे.

महिना अखेरीस बैठक
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेसंबंधी निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज आहे. केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली स्थापन करण्याचा प्रस्ताव या सर्वोच्च संस्थेसमोर आहे. सीबीटी 29 आणि 30 जुलै रोजी होणार्‍या बैठकीत याविषयीचा निर्णय घेणार आहे. देशातील 138 पेक्षा जास्त प्रादेशिक कार्यालयांच्या केंद्रीय डेटाबेसचा वापर करून पेन्शनचे वितरण केले जाईल आणि यामुळे एकाच वेळी 73 लाखाहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये लाभ जमा करणे सुलभ होईल, याविषयीची माहिती एका सूत्राने पीटीआयलासांगितले. सध्या देशातील 138 पेक्षा जास्त प्रादेशिक कार्यालये त्यांच्या प्रदेशातील निवृत्तीवेतनधारकांना स्वतंत्रपणे सेवा देतात आणि म्हणूनच देशभरातील पेन्शनधारकांना वेगवेगळ्या वेळी किंवा वेगवेगळ्या दिवशी पेन्शन मिळते.

पीएफ खाते हस्तांतरणाची झंझट संपणार

केंद्रीकृत पद्धत लागू झाल्यानंतर ईपीएफओ नोंदणीकृत सदस्यांना सर्व फायदे एका छताखाली मिळतील. यामध्ये डी-डुप्लिकेशन बंद होईल आणि अनेक पीएफ खाते एकाच खात्यात विलीन करता येतील. त्यामुळे नोकरी बदलल्यावर खाते हस्तांतरणाची आवश्यकता राहणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!