टेक

Oppo Reno8 Pro स्मार्टफोन लवकरच भारतात होऊ शकतो लाँच, जाणून घ्या खास फिचर्स

Buisness Batmya

OPPO ची फ्लॅगशिप Reno8 सीरीज लवकरच भारतात लाँच होणार असल्याची बातमी आली आहे. याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिली नसली तरी माय स्मार्ट प्राईसच्या रिपोर्टनुसार ओप्पो रेनो 8 सीरीज भारतात येत आहे. तसेच याआधी OPPO Reno8 सीरिज मे महिन्यात चीनमध्ये सादर करण्यात आली होती. त्यामुळे तेव्हापासून या स्मार्टफोन्सची वाट कंपनीचे भारतीय चाहते पाहत आहेत.Oppo Reno8 Pro smartphone may be launched in India soon, learn special features

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की OPPO Reno8 सीरिज पुढील महिन्यात 18 जुलैला भारतीयांच्या भेटीला येऊ शकते. या फोनची एंट्री ऑनलाइन इव्हेंटच्या माध्यमातून केली जाणार आहे. तसेच या सीरिजमध्ये Oppo Reno 8 आणि Oppo Reno 8 Pro स्मार्टफोन लाँच केले जातील.

रिचार्ज महाग फोन स्वस्त, सर्वात स्वस्त कीपॅडचे फोन, किंमत फक्त ३७८ रुपये

दरम्यान Oppo Reno8 Pro स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.7-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाईल. तर भारतात हा फोन मीडियाटेकच्या Dimensity 8100 Max SoC आणि MariSilicon X चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. तसेच हा फोन 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB UFS3.1 स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो.

या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 50MP Sony IMX766 सेन्सर, 8MP चा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा असेल. तर 32MP Sony IMX709 सेल्फी कॅमेरा दिला जाईल. Oppo Reno 8 Pro स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी आणि 80W सुपर फ्लॅश चार्जिंगसह दिली जाईल.

तसेच OPPO Reno 8 फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाईल. मीडियाटेकचा Dimensity 1300 SoC देण्यात येईल. त्यामुळे या स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे आणि सेल्फीसाठी 32MP चा सेन्सर आहे.

Gmail वापरकर्ते असाल तर,आता इंटरनेटशिवाय पाठवू शकाल ईमेल, कसं घ्या जाणून

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!