या जिल्ह्यांना ऑरेंज अन् यलो अलर्ट, राज्यात 4 दिवस

मुंबई, 22 मार्च : गेल्या आठवड्याभरात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मंगळवारी पहाटे मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस झाला. दरम्यान, येत्या चार दिवसात राज्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय. २५ मार्चपर्यंत राज्यातील विविध भागात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात अनेक भागात वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. त्यानंतर पावसाचं सावट नसलं तरी तापमान वाढेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली होता. पण मंगळवारी मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली.
खेळता खेळता पाण्याच्या हौदात पडले, एकाच कुटुंबातील तीन मुलांचा दुर्दैवी अंत
पश्चिमेकडून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्याच्या अनेक भागात मंगळवारी सकाळी पाऊस पडला. येत्या काही दिवसात ही स्थिती अशीच राहू शकते. तर तापमान किमान तीन अंश सेल्सिअसने वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मंगळवारी मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, महाबळेश्वर इथे तापमानाचा पारा ३० अंशांच्या खाली गेले होते. तर चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ३५.८ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली.