आर्थिकवाहन मार्केट

भारतात नवीन वर्षात पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त! हं…..

business batmya

नवी दिल्ली : जर भारत देशामध्ये पेट्रोल दर 25 रुपयांनी कमी होणार अस म्हटलं तर ते गैर किंवा चुकीचे मानता येणार नाही. कारण नवीन वर्षात पेट्रोलचे दर 25 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय़ झारखडं सरकारने घेताल आहे. झारखंड मधील नागरिकांना हे खुप  मोठी भेट म्हणावी लागेल. झारखंड सरकारच्या दोन वर्ष पूर्तीनिमित्त हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

झारखंड मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर अकांऊटवरून याची माहिती देण्यात आली आहे. मात्र या योजनेचा फायदा हा केवळ दुचाकी चालकांनाच होणार आहे.

Whatsapp Group Join
whatsapp channel Join

कोणाला होणार फायदा?

नवे दर हे येत्या 26 जानेवारीपासून लागू होणार आहेत. सध्या झारखंडमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 98.52 आहेत. त्यामध्ये 25 रुपयांची कपात केल्यास पेट्रोल प्रति लिटर 73 रुपयांवर येणार आहे. मात्र जे दुचाकीधारक आहेत, त्यांनाच सरकारच्या या योजनेचा फायदा मिळणार आहे. असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत याबाबत माहिती देण्यात आली आहे. सरकारने पेट्रोलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फायदा हा सामान्य मानसाला होणार आहे.

सरकारच्या निर्णयाचे स्वागत

यापूर्वी चार नोव्हेंबरला केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये कपात केली होती. उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे प्रति लिटर 5 व 10 रुपयांनी कमी झाले होते. केंद्रापाठोपाठ पंजाब, उत्तरप्रदेश या सारख्या राज्यांनी देखील इंधनाचे दर कमी केले होते. आता झारखड सरकारकडून देखील पेट्रोलचे दर कमी करण्यात आले आहेत.

दरम्यान एकीकडे पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल,डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरामुळे सामान्य माणलासा मोठा आर्थिक फटका बसत आहे. अशातच पेट्रोल तब्बल 25 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने सामान्य नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

हे सगळ असेल तरी  पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्थ केल्यास पेट्रोलवरील संपूर्ण कर सरकारला माफ करावा लागणार आहे. त्याचा मोठा आर्थिक ताण हा राज्याच्या तिजोरीवर येऊ शकतो. मात्र जनतेला मोठी भेट व लोकांच्या हिताच्या निर्णय महत्वाचा पाहुन हा निर्णय झारखंड राज्याने घेतला मात्र हा निर्णय महाराष्ट्रात लागू झाला तर बर होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button