पेट्रोल- डिझेल स्वस्त की महाग? पहा दर

business batmya
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल म्हणजेच कच्च्या तेलाच्या भावात चढ-उतार सुरू असल्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होते की काय अशी भीती व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षभरात पेट्रोल, डिझेलच्या (Petrol Diesel Price) वाढत्या दराने महागाईमध्ये चांगलीच भर टाकली आहे. मध्यंतरी विविध राज्यांची सरकारं आणि केंद्र सरकारने टॅक्स कपात करून इंधनाचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तरीही बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोलचे दर शंभरीच्या जवळपास आहेत.
मात्र तेल कंपन्यांनी आजचे (3 मार्च 2223) पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले असून आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
सध्या पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. देशातल्या चार महानगरांचा विचार करता दिल्लीतील पेट्रोलची किंमत 96.72 रुपये तर डिझेल 89.62 रुपयांनी विकले जात आहे. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai Petrol Price) पेट्रोलची किंमत प्रति लिटर 106.31 रुपये आहे आणि डिझेलची किंमत प्रति लिटर 94.27 रुपये आहे.
कोलकातामध्ये पेट्रोल प्रति लिटर 106.03 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 92.76 रुपयांवर विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 102.63 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 94.24 रुपये आहे. तथापि, देशातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये थोडीशी वाढ झाली आहे.
दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.