आर्थिक

Petrol-Diesel Price Today देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्राच्या या जिल्ह्यातः आजचे दर पहा

Petrol-Diesel Price Today Bussness batmya

Bussness batmya

IOCL, Petrol-Diesel Price Today 7 April 2022 : सातत्यानं वाढणाऱ्या इंधन दरवाढीपासून आज सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे आज देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.भारतीय तेल कंपन्यांनी गुरुवारसाठी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जारी केले आहेत.

या दोन नव्या लॅपटॉपवर मिळतेय बंपर ऑफर , जाणून घ्या फीचर्स

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

देशात 22 मार्चनंतर आजपर्यंत 14 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. या दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरांत 10 रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी 4 नोव्हेंबर, 2021 नंतर जवळपास चार महिन्यांपर्यंत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केली नव्हती.

या दरम्यान, ग्लोबल मार्केटमध्ये कच्चं तेल 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेलं होतं. त्यावेळी तेल कंपन्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला होता.

केंद्र सरकारतर्फे कृषी संस्थांना अनुदानावर मिळणार ड्रोन

गुरुवारी दरवाढ न झाल्यानं राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपयांवर स्थिर आहे. दरम्यान, स्थानिक करामुळे महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा दर 1.50 रुपयांनी वाढून 123.53 रुपये प्रति लिटर वर पोहोचला आहे. त्यामुळे परभणीत महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल विकलं जात आहे.

स्वस्त अन् मस्त! Oneplusचा 43 इंचाचा Smart TV उद्यापासून

शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)

मुंबई 120.51 104.77

दिल्ली 105.41 96.67

चेन्नई 110.85 100.94

कोलकाता 115.12 99.83

राज्यातील प्रमुख शहरातील भाव

आज राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे 85 पैशांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आज मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 तर डिझेल प्रति लिटर 104.77 रुपयांवर पोहोचले आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 120.47 रुपये लिटर तर डिझेल 103.19 रुपये लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 120.11 रुपये लिटर आणि डिझेल 102.84 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 120.13 आणि 102.84 एवढा आहे. नाशिकमध्ये पेट्रोल 120.27 रुपये लिटर तर डिझेल 102.97 रुपयांवर पोहोचले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!