उद्योग / व्यवसाय

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, करांमध्ये लवकरच मोठी कपात

नवी दिल्ली : आंतररराष्ट्रीय बाजारात रशियाकडून स्वस्तात कच्चा तेलाचा (Crude Oil Price) पुरवठा होत असताना आता केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात (Petrol Diesel Price) कपातीचे संकेत दिले आहे. त्यामुळे यंदाच्या होळीत महागाईचे दहण झाल्याची चर्चा रंगली आहे. रशियाकडून भारताला रोज 16 लाख बॅरल्स कच्चा तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे. तर इराककडून 9.4 लाख बॅरल, सौदी अरबकडून 6.5 लाख बॅरल, संयुक्त अरब अमिरातकडून 4 लाख बॅरल, अमेरिकेकडून 2.5 लाख बॅरल प्रत्येक दिवशी पुरवठा होत आहे.

2021 मध्ये भारताने रशियाकडून 1 टक्क्यांहून कमी कच्चा तेलाची आयात केली होती. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे.कच्चे तेल भारतीय तेल विपणन कंपन्या खरेदी केल्यानंतर शुद्धीकरण प्रकल्पात (Refineries) त्यातून पेट्रोल आणि डिझेलची निर्मिती करण्यात येते.

आंतरराष्ट्रीय भावानुसार दररोज देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर परिणाम होतो. तुमच्या शहरातील किंमती तुम्हाला घरबसल्या एका एसएमएसवर जाणून घेता येतात. तसेच इतर शहरातील भावही जाणून घेता येतात. सध्या देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यात फार मोठा बदल झालेला नाही.

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) मध्ये 0.01 टक्क्यांची वाढ होऊन 80.47 डॉलर प्रति बॅरल विक्री होत आहे. ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये (Brent Crude Oil) 0.41 टक्के वाढ झाल्याने एक बॅरलचा भाव 86.18 डॉलर झाला. गेल्यावर्षी 22 मे 2022 नंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही.

पण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलवरील कर कपातीचे संकेत दिले आहे. त्यामुळे काल झालेल्या होळीत महागाईचे दहण झाल्याची चर्चा रंगली आहे. अर्थात हा दिलासा कधी मिळणार हे मात्र केंद्र सरकारने ठामपणे सांगितले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!