उद्योग / व्यवसायवाहन मार्केट

पेट्रोल-डिझेलची थोड्याच दिवसांत 150 रुपयांपर्यंत पोहचणार!

Bussness batmya

Petrol-diesel will reach Rs 150 in a few days! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरूच आहे. आज (रविवार) देखील हे दर ८० ते ८५ पैशांनी वाढले आहेत. आतापर्यंत १३ दिवसांत ११ वेळा इंधन दरवाढ झाली असुन ८ रुपयांनी दर वाढले आहेत.पेट्रोल -डिझेल वाढतचं चालले आहे.

पेट्रोल महाग झाले म्हणून कोणीच कार अथवा बाईक अथवा इतर वाहन चालविणे बंद केले नाही. पेट्रोल व डिझेल चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आणि येथून पुढे तो अजून वाढत जाणार आहे. पेट्रोल 120 पर्यंत पोहचले आहे. येत्या काही दिवसातं हे पेट्रोल 150 चा आकडा गाठु शकतो हा तज्ञांचा अंदाज आहे. ( Petrol-diesel will reach Rs 150 in a few days! )

भारतात पेट्रोल-डिझेल कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. गॅसवर व अनेक कार येत आहे. मात्र गॅसची किमंतीही वाढत आहे. त्यामुळे आता भारतातील वाहन धरकांची खिसा मात्र रिकामा होत राहणार आहे.

भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार दिल्लीत इंधन दर ८० वाढले असून, पेट्रोल १०३.४१ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९४.६७ रुपये प्रति लिटर झाले आहे. याचबरोबर मुंबईत ८४ पैशांची वाढ झाली असुन त्यानुसार पेट्रोल ११८.४१ रुपये आणि डिझेल १०२.६४ रुपये प्रति लिटर झाले आहे.

याशिवाय चेन्नईमध्ये इंधन दरात ७५ पैशांची वाढ होऊन, पेट्रोल १०८.९६ रुपये आणि डिझेल ९९.०४ रुपये लिटर आहे. कोलाकातामध्ये पेट्रोल दरात ८४ पैशांची वाढ झाली असून पेट्रोल ११३.०३ रुपये लिटर पेट्रोल मिलथ आहे आणि डिझेलचे दर ८० पैशांनी वाढले असून डिझेल ९७.८२ रुपये प्रति लिटर झाले आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!