उद्योग / व्यवसाय

रेल्वे आता प्रवासच नाही तर ही विशेष सेवाही पुरवणार

buisness batmya

नवी दिल्ली: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, रेल्वे आता पार्सलच्या क्षेत्रातही हात आजमावणार आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे आता देशभरात डोअर-टू-डोअर पार्सल पोहोचवण्याची सुविधाही उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे पार्सल क्षेत्रालाही गती मिळणार असून, पायलट प्रोजेक्टला सुरुवात करण्यात आली आहे.Railways will now provide not only travel but also special services

तसेच भारतीय पोस्ट आणि भारतीय रेल्वेचे एक ‘जॉइंट पार्सल प्रॉडक्ट’ विकसित केले जात आहे, ज्यामध्ये टपाल विभागामार्फत फर्स्ट-माईल आणि लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाणार आहे आणि स्टेशनपर्यंत इंटरमीडिएट कनेक्टिव्हिटी रेल्वेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण पार्सल हाताळणी समाधान प्रदान करून व्यवसाय-ते-व्यवसाय आणि व्यवसाय-ते-ग्राहक बाजारपेठेला लक्ष्य करण्याचे जेपीपीचे उद्दिष्ट आहे.

आज हे शेयर्स तुम्हाला फायदा करुण देतील

याचा अर्थ असा आहे की जो कोण पार्सल पाठवणार असेल किंवा त्यांच्या परिसरातून पार्सल उचलणे, प्राप्तकर्त्याकडे बुकिंग करणे आणि घरोघरी वितरण करणे या सगळ्या जबाबदारी आता रेल्वेची असणार आहे. तसेच भारतीय रेल्वे आणि इंडिया पोस्टद्वारे पायलट प्रोजेक्टच्या आधारावर ‘जॉइंट पार्सल प्रॉडक्ट’ सुरू करण्यात आले आहे. त्यातील पायलट प्रोजेक्टची पहिली सेवा सुरत ते वाराणसी 31 मार्च 2022 रोजी सुरू झाली आहे.

रिलायन्स जिओची कमी किमतीत शानदार प्लॅन ऑफर

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या माध्यमातून एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनच्या दरम्यान संपर्क राहणार असल्याचे सांगितले. तसेच संपूर्ण पार्सल सेवा देऊन व्यवसाय ते व्यवसाय आणि व्यवसाय ते ग्राहक संपर्क प्रस्थापित करणे जेपीपीचे उद्दिष्ट असून, या अंतर्गत पार्सल पाठवणाऱ्याच्या परिसरातून पार्सल उचलणे, बुकिंग करणे आणि नंतर ते इच्छित स्थळी पोहोचवणे या सेवेचा समावेश करण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले आहेत.

शेतक-यांच्या शेतीमालासाठी योग्य दर मिळण्याकरिता सरकारनेआणली ही योजना

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!