
business batmya / business News / बिझनेस बातम्या
पुणेः 4 एप्रिल 2024ः राज्याच्या अनेक भागात उद्यापासून पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शनिवार ते सोमवारपर्यंत चांगला पाऊस पडेल. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Onion Export 10 हजार टन कांदा दुबई साठी का निर्यात जाणून घ्या…
शुक्रवारी नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शनिवारी मराठवाड्यातील छत्रपती शिवाजी नगर, धाराशिव, लातूर आणि नांदेड, खान्देशातील जळगाव, नंदुरबार आणि धुळे आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर आणि सांगली येथे हलक्या पावसाची शक्यता आहे.
5 रुपये अनुदानाचे दुध उत्पादकांच्या खात्यावर 100 कोटी जमाः तुमच्या खात्यावर आले का पैसे
रविवारी मराठवाड्यात छत्रपती शिवाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड आणि खान्देशात, जळगाव, नंदुरबार आणि धुळे आणि मध्य महाराष्ट्रात, नाशिक, पुणे येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. सोलापूर, सातारा, सांगली. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
5लाखांची कार फक्त 82 हजारात Maruti Alto खरेदी करा
सोमवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले.