Daily News

पावसाचा रामराम, पण धो-धो पडूनचं जाणार ते एवढ्या दिवस Heavy rain in Maharashtra

पावसाचा रामराम, पण धो-धो पडूनचं जाणार

business batmya / business News / बिझनेस बातम्या

धिरेंद्र कुलकर्णी

मुंबई, ता. 17 आॅक्टोबर 2024-   यंदा देशामध्ये आणि महाराष्ट्र मध्ये मान्सूनच्या पावसाने चांगलीच बॅटिंग केलेली आहे. यामुळे सर्वत्र पाणी पाणी झालेलं आहे. मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला आहे. मान्सून आता जाता जाता रामराम करतोय, मात्र जाता जाता राम राम करताना पावसाचा जोर पुन्हा वाढताना दिसतोय. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे पीक कापणीला आलेले असताना आता हा पाऊस पिकांची नासाडी करणार आहे. यामुळे शेतकरी धास्तवलेला आहे.Ramram of rain, but it will pass

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

फक्त 7 रुपयात 5000 हजार रुपये पेन्शन मिळणार केंद्राची योजना

पावसाचा अंदाज कसा आहे घ्या जाणून

हवामान खात्यांना महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे. यामध्ये आपण जर आज 17 तारखेला पाहायला गेलं तर नगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना येलो अलर्ट आज देण्यात आलेला आहे.

तुमच्या बॅंकेतील खात्यावरील पैसे या पध्दतीने गायब करतात हे लोक

18 तारखेला पाहायला जर गेलं तर ठाणे , रायगड,  रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना 18 तारखेला येलो अलर्ट  देण्यात आलेला आहे.

19 ऑक्टोबर रोजी हवामान खात्याने जो अंदाज दिलाय त्यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर औरंगाबाद परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद चंद्रपूर गडचिरोली वर्धा, वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांसाठी देण्यात आलेला आहे.

सलग चार दिवस पुढे पाऊस असणार आहे मात्र यामध्ये बदल होऊ शकतो. हवामान खात्याकडे जसा बदल होतो तसा अपडेट जारी होतं. तसा जिल्ह्यांचा स्वरूप बदलतं. प्रत्येक जिल्ह्याची हवामानाची स्थिती चेंज होते. हवामान खात्याचा अपडेट आपल्याला कळण्यासाठी आपण आमच्या बिजनेस बातम्या सोबत जोडले जा, जेणेकरून तुम्हाला तात्काळ अपडेट मिळू शकेल,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!