भारताच्या अर्थसंकल्पामध्ये काय मिळाले अगदी थोडक्यात वाचा

business batmya
12:32 PM, Feb 01 2022
अर्थसंकल्प २०२२ : मोबाइलसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार
12:31 PM, Feb 01 2022
पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या रसायनांवरील आयात शुल्कात घट, इंधन स्वस्त करण्याचा प्रयत्न
12:30 PM, Feb 01 2022
प्राप्तीकर रचनेत कोणताही बदल नाही, नोकरदारांच्या पदरी निराशा
12:28 PM, Feb 01 2022
करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी सरकारचे पाऊल, छापेमारीत सर्वच संपत्ती जप्त करणार
12:23 PM, Feb 01 2022
जीएसटी संकलनातून जानेवारी २०२२ मध्येच १ लाख ४० हजार ९८६ कोटी रुपये, अर्थमंत्र्यांची माहिती
12:17 PM, Feb 01 2022
क्रिप्टोच्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार, अर्थमंत्र्यांची घोषणा
12:17 PM, Feb 01 2022
मोठी घोषणा, कॉर्पोरेट टॅक्सवरील सरचार्ज १२ वरून ७ टक्क्यांवर
12:13 PM, Feb 01 2022
कॉर्पोरेट टॅक्स १८ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर
12:11 PM, Feb 01 2022
सहकारी संस्थांना द्यावा लागणारा पर्यायी किमान कर (अल्टरनेटिव्ह मिनिमम टॅक्स) १८ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर
12:09 PM, Feb 01 2022
प्राप्तिकर परतावा विवरणपत्र भरताना काही चुका झाल्यास दुरुस्त करण्याची पुन्हा संधी मिळणार
12:05 PM, Feb 01 2022
नगर नियोजन क्षेत्रातील पाच शिक्षणसंस्थांच्या आधुनिकीकरणासाठी २५० कोटींचा निधी
12:03 PM, Feb 01 2022
अर्थसंकल्प २०२२ – सर्व मंत्रालयांमध्ये खरेदी व्यवहारांसाठी ई-बिल यंत्रणा सुरू करणार
12:02 PM, Feb 01 2022
डिजिटल चलनामुळे अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळेल
12:01 PM, Feb 01 2022
रिझर्व्ह बँक आणणार डिजिटल चलन, ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून डिजिटल रुपया आणणार
11:56 AM, Feb 01 2022
सरकार भांडवली खर्च १०.६८ लाख कोटी करणार, अर्थमंत्र्यांची घोषणा
11:56 AM, Feb 01 2022
भांडवली गुंतवणुकीत ३५.४० टक्के वाढ. ७.५० लाख कोटी रुपये गुंतवले जाणार
11:52 AM, Feb 01 2022
पर्यावरणपूरक विकासासाठी कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर – निर्मला सीतारामन, अर्थमंत्री
11:51 AM, Feb 01 2022
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी स्वदेशी उद्योगांकरिता संरक्षण खर्चापैकी ६८ टक्के तरतूद
11:48 AM, Feb 01 2022
संरक्षण क्षेत्रातील २५ टक्के संशोधन आणि विकासाचा निधी खासगी कंपन्यांना संशोधनासाठी उपलब्ध करून देणार
11:48 AM, Feb 01 2022
विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) कायदा बदलणार, नव्या कायद्यात राज्यांचीही महत्त्वाची भूमिका असणार
11:47 AM, Feb 01 2022
सर्व गावांमध्ये भारत नेटद्वारे ऑप्टिकल फायबरसाठी कंत्राट देणार आणि २०२५मध्ये प्रत्येक गावात इंटरनेट असणार
11:46 AM, Feb 01 2022
२०२२-२३ मध्ये ५ जी मोबाइल सेवा सुरू होणार
11:46 AM, Feb 01 2022
टेलिकॉम क्षेत्रासंबंधी अर्थमंत्र्यांच्या घोषणा, स्पेक्ट्रम लिलाव यावर्षी करणार, या क्षेत्रात रोजगाराच्या संधी
11:41 AM, Feb 01 2022
जमिनीसंबंधीच्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन
11:40 AM, Feb 01 2022
देशातील मोठ्या पाच टाउनशिपमध्ये शैक्षणिक संस्था उभारण्याचा मानस
11:39 AM, Feb 01 2022
शेअर बाजारात अर्थसंकल्पाबाबत नकारात्मक वातावरण. अर्धा तासात निर्देशांकात जवळपास १ टक्का घट. लोकप्रिय योजना अधिक असल्याचा परिणाम. सकाळी महागलेल्या ऑप्शन प्रीमियममध्ये घट
11:39 AM, Feb 01 2022
ई-चीप असलेले पासपोर्ट यावर्षीपासून मिळणार
11:37 AM, Feb 01 2022
उद्योगांना परवाना प्रक्रियेसाठी एक खिडकी वेबसाइटची निर्मिती करणार
11:37 AM, Feb 01 2022
ई-पासपोर्ट योजनेला चालना देणार, अर्थमंत्र्यांची घोषणा
11:36 AM, Feb 01 2022
उद्योगधंदे अधिक सुरळीत करण्यासाठी अनेक जुन्या प्रक्रिया रद्द
11:35 AM, Feb 01 2022
७५ डिजिटल बँकिंग केंद्रे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ डिजिटल जिल्ह्यांत
11:35 AM, Feb 01 2022
डिजिटल व्यवहारांसाठी मागील अर्थसंकल्पात दिलेल्या सुविधा यावर्षीही लागू राहणार
11:35 AM, Feb 01 2022
४.५ लाख टपाल कार्यालये डिजिटल पेमेंट अंतर्गत येणार
11:35 AM, Feb 01 2022
सीमेवरील गावांसाठी व्हायब्रंट व्हिलेज योजना
11:29 AM, Feb 01 2022
पंतप्रधान आवास अंतर्गत ८० लाख घरे बांधणार, ४८,००० कोटींचा निधी देणार
11:29 AM, Feb 01 2022
‘हर घर, नल से जल’द्वारे घरांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्याची योजना
11:28 AM, Feb 01 2022
२ लाख अंगणवाड्या अद्ययावत करणार, अर्थमंत्र्यांची घोषणा
11:28 AM, Feb 01 2022
शक्ती, वात्सल्य, सक्षम अंगणवाडी २.० योजना सुरू
11:27 AM, Feb 01 2022
डिजिटल विद्यापीठ स्थापन करणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
11:27 AM, Feb 01 2022
पीएम ई- विद्या चॅनल सुरू करणार, शिक्षणासाठी उच्च दर्जाचा ई-कंटेन्ट उपलब्ध करून देणार
11:26 AM, Feb 01 2022
विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा, शालेय शिक्षणासाठी १०० टीव्ही चॅनेल, स्थानिक भाषेत शिक्षण
11:23 AM, Feb 01 2022
मोठी बातमी: स्टार्टअपसाठी ड्रोनशक्ती योजनेची घोषणा
11:23 AM, Feb 01 2022
एमएसएमई क्षेत्रासाठी पुढील पाच वर्षांसाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद
11:21 AM, Feb 01 2022
कृषी क्षेत्रातील स्टार्ट अप प्रकल्पांना नाबार्डच्या माध्यमातून मदत करणार
11:19 AM, Feb 01 2022
पिकांच्या देखरेखीसाठी शेतकऱ्यांना ड्रोन वापरण्यास परवानगी
11:17 AM, Feb 01 2022
नीलांचल इस्पात लिमिटेडच्या खाजगीकरणास मंजुरी
11:17 AM, Feb 01 2022
येत्या तीन वर्षांत ४०० नव्या वंदे भारत ट्रेन धावणार, ३ वर्षांत ४०० नवीन बुलेट ट्रेन
11:16 AM, Feb 01 2022
पर्वतमाला योजनेतून डोंगराळ भागात प्रवास आणि पर्यटनाला चालना देणार
11:14 AM, Feb 01 2022
रेल्वे, जल, हवाई वेगवान वाहतुकीसाठी गुंतवणूक करणार, १०० नवे कार्गो जाळे विणणार
11:12 AM, Feb 01 2022
पंतप्रधान गती शक्ती योजनेंतर्गत राष्ट्रीय महामार्गांचे जाळे वाढवणार, त्यासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद
11:09 AM, Feb 01 2022
पंतप्रधान गती शक्ती योजनेंतर्गत पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा
11:09 AM, Feb 01 2022
पुढील पाच वर्षांत ६० लाख नव्या रोजगारांच्या निर्मितीचे लक्ष्य – अर्थमंत्री
11:08 AM, Feb 01 2022
लवकरच एलआयसीचा आयपीओ आणणार- निर्मला सीतारामन
11:06 AM, Feb 01 2022
भारताचा विकास दर ९.२७ टक्के असण्याचा अंदाज, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
11:05 AM, Feb 01 2022
डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यावर अधिक भर
11:03 AM, Feb 01 2022
लोकसभेचे कामकाज सुरू, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पी भाषण सुरू
10:43 AM, Feb 01 2022
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी, थोड्याच वेळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सभागृहात अर्थसंकल्प सादर करणार