मोबाईल

Realme 9 4G भारतात होणार लाँच, जाणून घ्या फिचर्स

buisness batmya

मुंबई : येत्या काळात भारतात विविध नवनवीन स्मार्टफोन लाँच होत आहे. त्यात रियलमी चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी आगामी काळात भारतात अनेक स्मार्टफोन लाँच करणार असून, त्यापैकी एक फोन लॉन्च करण्याची तारीख कंपनीने नुकतीच जाहीर केली आहे. तसेच कंपनी 7 एप्रिल रोजी भारतात रियलमी 9 4जी हा फोन सादर करणार असून तो कंपनीच्या मार्की सिरीजमधील आत्ताचा फोन असणार आहे. त्याचबरोबर या दिवशी Realme आपला फ्लॅगशिप फोन, रियलमी जीटी 2 प्रो सह नवीन Realme Book लॅपटॉप देखील भारतात लॉन्च करणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार या फोनचे सर्वात आकर्षक फीचर म्हणजे या फोनचा कॅमेरा. जे युजर्स चांगल्या कॅमेरा फोनच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकणार आहे. कारण Realme 9 4G च्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा असल्याची माहिती देण्यात आली आहे.Realme 9 4G will be launched in India, find out the features

दरम्यान या कंपनीने पोस्टद्वारे फोनच्या लॉन्चची तारीख जाहीर केली असून, त्यामध्ये Realme ने सांगितले की Realme 9 4G ‘9X focusing accuracy’ ऑफर करण्यास सक्षम असून फोनमध्ये दिलेला 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा ग्राहकांना आवडणारा असेल. तसेच Realme ने गेल्या वर्षी 108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला पहिला फोन म्हणून 8 Pro लाँच केला होता. त्यामुळे Realme 9 4G सह, कंपनी शॉट्स कॅप्चर करण्याचे आणखी काही मार्ग सादर करण्याची योजना बनवू शकते. तसेच Realme 9 4G 108 मेगापिक्सेल ISOCELL HM6 इमेजिंग सेन्सर वापरेल जो Samsung ने विकसित केला असल्याचे सांगितले आहे.

जगातील इतर कार पेक्षा एक लिटर मध्ये सर्वात जास्त पळणारी कारची नोंद

Realme 9 4G चे स्पेसिफिकेशन्स

Realme 9 4G 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरासह येईल, जो डिस्प्लेवरील पंच-होलच्या कटआऊटमध्ये असेल. टिपस्टर अभिषेक यादवने Realme 9 4G चे एक पोस्टर ट्विट केले आहे.त्यात यादवने दिलेल्या माहितीनुसार हा फोन 90Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटसह AMOLED डिस्प्लेसह सादर केला जाईल. तसेच फोनची बॉडी 7.99mm पातळ असेल आणि या फोनचे वजन 178 ग्रॅम असेल. दरम्यान Realme 9 4G Ripple Holographics Design सह बाजारत दाखल होणार आहे. जे आपण अलीकडेच Realme 9 5G SE मध्ये पाहिलं आहे. हा फोन Sunburst Gold, Stargaze White आणि Meteor Black या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केला जाईल. तसेच हा फोन 15 ते 20 हजार रुपयांच्या रेंजमध्ये लाँच केला जाणार असल्याची शक्यता आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये महत्त्वपूर्ण व्यापारी करार

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!