या टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन होणार महाग

Buisness Batmya
मुंबई : अनेक वर्षांपासून Jio च्या लो-प्राइसिंगशी स्पर्धा केल्यानंतर गेल्या काही काही वर्षात टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ हाइक करणे सुरू केले. त्यामुळे आता टेलिकॅाम कंपन्या प्रीपेड टॅरिफच्या किमती वाढवू शकतात. त्यामुळे मोबाईल फोन युजर्सला आणखी एक झटका देणार असून टेलिकॅाम कंपन्या त्यांचे रिचार्ज प्ल्रन महाग करू शकतात.Recharge plans of these telecom companies will be expensive
दरम्यान रेटिंग एजेंसी Crisil च्या रिसर्च फर्मच्या मते कोणत्याही इंडस्ट्रीसाठी सरासरी महसूल वाढवणे नवीन गुंतवणूकीसाठी गरजेचे असते. त्यामुळे असं नाही केले तर वापरकर्त्यांना दर्जेदार सेवा मिळणं कठीण होते.
या कंपन्यांच्या किती किंमती वाढू शकतील ?
यावर्षी जीओ, एअरटेल, वी च्या महसूलात 20 ते 25 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. कारण मागील आर्थिक वर्षात कंपन्यांच्या सरासरी महसूलात 5 टक्क्यांची वृद्धी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे आता या कंपन्या 15 ते 20 टक्क्यांची वृद्धीचा प्रयत्न करणार असल्यामुळे या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहित आपल्या योजनांचे प्लॅन्स वाढवू शकतील.
तुम्ही 7 सीटर कार खरेदीचा विचार करताय, 10 लाखापेक्षा कमी किंमतीच्या कारसबद्दल जाणून घ्या