येत्या आर्थिक वर्षात करवसुलीतून केंद्राच्या तिजोरीत २७.०७ लाख कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न
buisness batmya
नवी दिल्ली: गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटाने देशाच्या अर्थव्यवस्था कोलमडली होती. पण आता कुठे कोरोनाच्या संकटातून सगळ्या क्षेत्रांमध्ये सुधारताना होताना दिसत आहेत. त्यामुळे कुठे भारतीय अर्थव्यवस्था आता सुरळीत होत असून, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये करवसुलीतून २७.०७ लाख कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला सरत्या आर्थिक वर्षात चांगलाच बूस्टर मिळाला असून, केंद्र सरकारने सवलतींशिवाय उत्पन्न वाढणे नव्या व्यवस्थेचे यश असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.Record income of Rs 27.07 lakh crore from tax collection in the coming financial year
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार सरत्या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करांच्या वसुलीत ४९ टक्क्यांची आणि अप्रत्यक्ष करांच्या वसुलीत २० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. हे उत्पन्न अंदाजित उत्पन्नापेक्षा ( २२.१७ लाख कोटी) पाच लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात करवसुलीतून केंद्राच्या तिजोरीत २०.२७ लाख कोटी रुपयांची भर पडली होती. तसेच आर्थिक वर्ष २०२१-२२मध्ये प्रत्यक्ष करापोटी १४.१० लाख कोटी रुपयांची तिजोरीत भर पडली आहे.
आता या बॅंकेतून फक्त 5000 रुपये काढता येणारः RBI चे निर्बंध!
केंद्रीय अर्थसंकल्पात गेल्या वर्षी ११ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न प्रत्यक्ष करांतून मिळाले असल्याचा , अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु या करांच्या माध्यमातून १२.९० लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने हे उत्पन्न अंदाजित उत्पन्नापेक्षा १.८८ लाख कोटी रुपयांनी अधिक आहे. मात्र, केंद्र सरकारने देशभर हाती घेतलेल्या लसीकरण मोहिमेमुळे अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळाला असून, कर उत्पन्नांत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. याशिवाय केंद्र सरकारचे प्रयत्नही कारणीभूत आहेत, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
आर्थिक वर्ष २०२१-२२मध्ये कंपनी करापोटी ८.६ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत (६.५ लाख कोटी रुपये) ते अधिक आहे. त्यामुळे कराचे कमी दर आणि कोणत्याही सवलतींशिवाय उत्पन्न वाढणे हे नव्या व्यवस्थेचे यश असल्याचेही अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. म्हणूनच या कालावधीत प्राप्तिकर विभागाने २.२४ लाख कोटी रुपयांचा परतावाही दिला आहे.
मार्च २०२२ च्या शेवटी वस्तू आणि सेवा कराचे एकूण उत्पन्न एक लाख ४२ हजार ९५ कोटी रुपयांवर पोहोचल्याने या उत्पन्नामध्ये ‘सीजीएसटी’पोटी मिळालेल्या २५,८३० कोटी रुपयांचा, ‘एसजीएसटी’पोटी प्राप्त झालेल्या ३२,३७८ कोटी रुपयांचा, ‘आयजीएसटी’द्वारे मिळालेल्या ७४,४७० कोटी रुपयांचा आणि उपकरांमुळे मिळालेल्या ९,४१७ कोटी रुपयांचा समावेश आहे.
येणा-या आर्थिक वर्षात तब्बल ९७ कंपन्या आयपीओच्या माध्यमातून २.२५ लाख कोटी रुपये करणार गोळा