टेक

Redmi च्या ‘या’ स्मार्टफोनने फक्त 1 तासात विकले 2.7 लाखांपेक्षा जास्त यूनिट

Buisness Batmya

सध्या Redmi ने सादर केलेल्या पहिल्याच सेलमध्ये स्मार्टफोनचे फक्त एक तासात 2,70,000 पेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत. त्यामुळे Redmi ने आपल्या नावे पुन्हा एकदा नवा विक्रम केला आहे. लवकरच भारतात देखील हा हँडसेट येऊ शकतो, त्यामुळे भारतात देखील असा प्रतिसाद मिळेल की नाही ते पाहावं लागेल.Redmi’s ‘Ya’ smartphone sold over 2.7 lakh units in just 1 hour

तसेच हा धमाकेदार प्रतिसाद याआधी चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सेलमध्ये मिळाला होता. पण यातून कंपनीची नेमकी किती कमाई झाली याची माहिती मात्र मिळाली नाही.

Redmi Note 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

Redmi Note 11T Pro फोनमध्ये 67 वॉट फास्ट चार्ज सपोर्टसह 5080mAh ची बॅटरी असून प्रोसेसिंगसाठी यात मीडियाटेकचा डिमेन्सिटी 8100 चिपसेट मिळतो. तर सोबत 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. तसेच सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो.

व्हॉट्सअॅपवर आता लवकरच येणार हे नवीन फिचर्स, पहा कोणते

या फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून, जो 144 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तर हा फोन डॉल्बी व्हिजन आणि डीसी डिमिंग सपोर्टसह बाजारात आला आहे. यामधे बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून ज्यात 64 मेगापिक्सलचा ISOCELL GW1 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. फोनच्या फ्रंटला सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi Note 11T Pro ची किंमत

Redmi Note 11T Pro चा 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंट 1699 युआन  मध्ये लाँच झाला आहे. तर 8 जीबी रॅम व 128 जीबी मॉडेलची किंमत 1,999 युआन आणि 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज असलेला टॉप व्हेरिएंट 2099 युआन मध्ये विकत घेता येईल.

तुम्ही 7 सीटर कार खरेदीचा विचार करताय, 10 लाखापेक्षा कमी किंमतीच्या कारसबद्दल जाणून घ्या

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!