रूपयाची निच्चांकी घसरण कायम; तुमच्यावर काय परिणाम होईल?

buisness batmya
मुंबई- भारतात अनेक वस्तू परदेशातून आयात केल्या जातात त्यात पेट्रोलियम पदार्थांसह खाद्यतेल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा समावेश आहे. तसेच परदेशी गुंतवणूकदारांनी सातत्याने भांडवली बाजारातूल पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे भारतीय चलनाचा जबर फटका बसत आहे. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८० रुपये प्रति डॉलरची घसरण पाहायला मिळत आहे.
तसेच जर रुपयाची घसरण सुरु राहिली आणि डॉलरची किंमत वाढत राहिली तर आयात वस्तूंवर आपल्याला जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे रुपया प्रति डॉलर ८० रुपयांच्या खाली गेल्याने व्यापाऱ्यांना प्रचंड नैराश्य आले आहे. आणि रुपयाच्या घसरणीचा अर्थव्यवस्थेवरही विपरित परिणाम होत आहे.
इंस्टाग्रामने युजर्ससाठी आणले नवीन फीचर
यामध्ये आयात वस्तूंवर खर्च वाढल्यास देशात विक्रीसाठी देखील त्या वस्तूंच्या किमती वाढणार असून,रिफाइंड ऑईल, मोबाईल आणि लॅपटॉपपर्यंत अनेक वस्तू महाग होऊ शकतात. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्यामुळे विदेशातील शिक्षणासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे. तर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यामुळे शिक्षणकर्जेही महागली आहेत.