Samsung Galaxy F13 भारतात लॉन्च होण्यासाठी सज्ज, पहा काही खास वैशिष्ट्ये
Buisness Batmya
Samsung Galaxy F13 आज भारतात लॉन्च होण्यासाठी सज्ज असून, दुपारी 12 वाजता फोन सादर केला जाणार. तुम्हाला सांगतो की कंपनी ब-याच दिवसांपासून फ्लिपकार्टवर Galaxy F13 लॉन्च करण्याबद्दल बोलत असून, हा फोन फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध केला जाईल. सध्या, कंपनीने फोनच्या स्पेसिफिकेशन्सच्या तपशीलाबद्दल सांगितले नाही, परंतु आम्ही तुम्हाला अशा काही वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहे, जे सॅमसंगच्या नवीन फोनमध्ये सादर केले जाण्याची शक्यता आहे.Samsung Galaxy F13 ready to launch in India, see some special features
Telegram चे Telegram Premium लाँच, काही खास फीचर्ससाठी मोजावे लागतील इतके पैसे
यामध्ये ऑटो डेटा स्विचिंग फीचर देण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच असे सांगितले जात आहे की Samsung Galaxy F13 गुलाबी, निळा आणि हिरव्या रंगात खरेदी केला जाऊ शकतो. त्याची रॅम 8GB पर्यंत वाढवता येऊ शकते आणि ग्राहकांना त्यात रॅम प्लस फीचर मिळण्याचीही अपेक्षा आहे. तसेच कॅमेरा म्हणून, या फोनला LED फ्लॅशसह मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाण्याची अपेक्षा आहे.
6000mAh बॅटरी
पॉवरसाठी, फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे जी 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते, आणि असेही म्हटले जात आहे की ते चांगल्या स्टँडबाय टाइमसह येईल, ज्यामुळे वारंवार चार्जिंगचा त्रास दूर होईल. साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर फोनमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. तसेच या फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर सॅमसंग गॅलेक्सी F13 भारतात 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होईल.
एक्सचेंज ऑफर! 11 हजार पेक्षा जास्त सूट, Redmi चा जबरदस्त फोन आणा घरी