मोबाईल

सॅमसंगने गुपचूप लाँच केला ५०००mAh बॅटरीसह येणारा स्वस्त स्मार्टफोन

business batmya

नवी दिल्ली :Samsung Galaxy M13 Laucned: Samsung ने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Samsung Galaxy M13 ला गुपचूप लाँच केले आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत साइटवर लिस्टेड आहे. यावरून या बजेट फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि डिझाइनची माहिती मिळते. गॅलेक्सी एम१३ एक ऑक्टा-कोर Exynos ८५० चिपसेटसह येतो. यात १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ६.६ इंच फुल-एचडी+ डिस्प्ले दिला असून, यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप स्टाइल नॉच आहे. एलईडी फ्लॅशशह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. Samsung Galaxy M13 फोनबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Galaxy M13 चे स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy M13 मध्ये फुल एचडी+ रिझॉल्यूशन ६.६ इंच इनफिनिटी-व्ही डिस्प्ले दिला आहे. फोन ऑक्टा-कोर एक्सिनोस ८५० चिपसेटसह येतो. यात ४ जीबी रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज दिले आहे. फोनच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवू शकता. सॅमसंगचा फोन अँड्राइड १२ आधारित वन यूआय ४.१ स्किनवर काम करतो. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये ५० मेगापिक्सल मुख्य सेंसर, एफ/२.२ अपर्चरसह ५ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेंसर आणि एफ/२.४ अपर्चरसह २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला आहे. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा फिक्स्ड-फोकस कॅमेरा मिळतो.

हँडसेटचे डायमेंशन ७६.९x१६५.४x८.४mm आणि वजन जवळपास १९२ किलो आहे. यामध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. यात सॅमसंग नॉक्स मोबाइल सुरक्षा प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ४जी LTE, ड्यूल बँड वाय-फाय (२.५Ghz/५GHz) आणि ब्लूटूथ v5.0 चा सपोर्ट मिळतो. दरम्यान, कंपनीने फोनच्या लिस्टिंगमध्ये याच्या किंमतीबाबत माहिती दिलेली नाही. मात्र, स्पेसिफिकेशन्सवरून फोनची किंमत खूपच कमी असण्याची शक्यता आहे. हँडसेट डीप ग्रीन, लाइट ब्लू आणि ऑरेंज कॉपर कलर्समध्ये येतो. दरम्यान, याच्या आधीचे मॉडेल गॅलेक्सी एम१२ ला मार्च २०२१ मध्ये भारतात लाँच करण्यात आले होते. याच्या ४ जीबी + ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये होतील. या फोनला ब्लॅक, एलिगेंट ब्लू आणि ट्रेंडी एमराल्ड ग्रीन रंगात सादर केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!