सॅमसंगचा 5G स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॅान्च, पहा किंमत आणि फिचर्स

Buisness Batmya
मुंबई : सध्या सॅमसंगचा जबरदस्त 5G स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार असून, Samsung Galaxy A13 5G हा फोन भारतात लवकरच लॉन्च होत आहे. तसेच हा स्मार्टफोन कमी किमतीचा असून यात जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहेत. आणि सोबतच दमदार 5000mAh बॅटरी व 50MP कॅमेरा असेल. चला तर मग या नव्या Samsung मोबाईल बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या.Samsung’s 5G smartphone to be launched in India soon, see price and features
Redmi च्या ‘या’ स्मार्टफोनने फक्त 1 तासात विकले 2.7 लाखांपेक्षा जास्त यूनिट
दरम्यान Samsung Galaxy A13 5G ची भारतात किंमत किती असणार याची उत्सुकता आहे. तर Galaxy A13 5G च्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत यू एस डॉलर $250 (सुमारे 19,400 रुपये) आहे. तसेच आधीच्या रिपोर्टनुसार, 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत युरोपमध्ये 209 युरो (अंदाजे रु. 17,400) असेल. त्यामुळे त्यावेळी या हँडसेटच्या 4GB + 128GB वेरिएंटची किंमत 239 युरो (सुमारे 19,900 रुपये) सांगितली जात आहे.
Samsung Galaxy A13 5G स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A13 5G 90Hz रिफ्रेश रेट, 720 x 1600 पिक्सेल रिझोल्यूशन आणि वॉटरड्रॉप नॉचसह 6.5-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्याता आला आहे. त्याअंतर्गत, Galaxy A13 5G मध्ये एकात्मिक Mali G57 GPU सह ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसर या फोनमध्ये असणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज असून, ज्यामध्ये 50MP प्राथमिक शूटरचा समावेश आहे. तर गॅलेक्सी उपकरणावरील उच्च-रिझोल्यूशन सेन्सर 2MP मॅक्रो, 2MP डेप्थ सेन्सर आणि एलईडी फ्लॅशसह उपलब्ध आहे. तर सेल्फीसाठी यामध्ये 5MP कॅमेरा असणार आहे.
तुम्ही 7 सीटर कार खरेदीचा विचार करताय, 10 लाखापेक्षा कमी किंमतीच्या कारसबद्दल जाणून घ्या