शेयर मार्केट

Share Market: शेअर बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आजचे दमदार 10 शेअर्स

business batmya

Share Market Prediction: शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली. बँकिंग, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे निफ्टी 16300 च्या वर बंद झाला आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 632.13 अंकांच्या म्हणजेच 1.17 टक्क्यांच्या वाढीसह 54,884.66 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 182.30 अंकांच्या म्हणजेच 1.13 टक्क्यांच्या वाढीसह 16,352.45 वर बंद झाला.

गुंतवणूकदार शुक्रवारी खरेदीच्या मूडमध्ये होते असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. शिवाय अमेरिकेत चांगल्या निकालामुळे बाजाराचा मूड सुधारला. याशिवाय एफआयआयच्या विक्रीत घट झाल्यानेही बाजाराला सपोर्ट मिळाला. आता बाजाराच्या नजरा आरबीआयच्या धोरणात्मक बैठकीकडे असतील. ज्यामध्ये व्याजदरात आणखी 0.25-0.35 टक्क्यांची वाढ होऊ शकते.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

गेल्या दोन दिवसांपासून बाजारातील वातावरण सुधारत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. आता जर निफ्टी 16,414 च्या वर गेला तर तो 16,624 ची पातळी आणि त्यानंतर 16,825 ची दुसरी लेव्हल पाहू शकतो. निफ्टीला खाली 16,006 वर सपोर्ट दिसत आहे.

निफ्टीने आधीच 15,735 स्तरावर मल्टिपल सपोर्ट घेतल्याचेMOFSL चे चंदन तापडिया म्हणाले. 16,666 च्या झोनमध्ये मजबूत सप्लाय असूनही, पाया मजबूत होत आहे. बाजाराच्या संपूर्ण सेटअपवर नजर टाकल्यास निफ्टी 16400 आणि नंतर 16,666 च्या दिशेने जाताना दिसत आहे. बँक निफ्टी कंसोलिडेशन ब्रेकआउटनंतर चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. जर बँक निफ्टी 34,750 च्या झोनमध्ये राहिला तर तो 36,000-36,500 च्या दिशेने जाताना पाहू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!