Share Market भारतीय शेयर मार्केट वर्षाच्या पहिल्या दिवशी काय रंग दाखविणार
business batmya
मुंबईः (Share Market) शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करणा-यांसाठी सकाळची सुरुवात कशी होते याकडे लक्ष लागून राहते. 2021 हे वर्ष गुंतवणूक दारांसाठी खुप चांगल गेले. कधी चढ तर कधी उतार होत शेयर मार्केट राहिले. वर्षाचा शेवटच्या दिवशी शेयर्स मार्केट भारतात (Share Market) वाढ होतांना दिसून आली. मात्र आज 2022 मध्ये सोमवार असल्याने आज काय स्थिती राहिली याकडे गुंतवणूक दारांचे लक्ष लागून आहे. (Share Market What color will the Indian stock market show on the first day of the year? )
शुक्रवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 459 अंकांनी (0.08टक्के) वाढून 58,253.82 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)चा निफ्टी (Nifty)150.10 अंकांनी म्हणजेच 0.87 टक्क्यांच्या वाढीसह 17,354.05 वर बंद झाला.
व्हॅल्यूएशनची चिंता असूनही, निफ्टी-50 निर्देशांकाने आशियातील सर्व अर्थव्यवस्थांना मागे टाकले आणि एमएससीआय जागतिक निर्देशांकाला मागे टाकले आहे, ज्याने यावर्षी केवळ 17 टक्के परतावा दिला आहे.भारताला अनेक संकटाचां समान करावा लागत आहे. या सगळ्या आव्हानांव्यतिरिक्त सेन्सेक्स आणि निफ्टीने 2021 मध्ये अनुक्रमे 22 टक्के आणि 24 टक्के परतावा दिला आहे आणि गेल्या 4 वर्षातील दोघांची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
2022 मध्ये आपल्याला थोडी अधिक अस्थिरता दिसू शकते, परंतु असे असूनही, 2022 हे गुंतवणूकदारांसाठी खूप चांगले वर्ष असेल असेही ते म्हणाले. 2022 मध्ये पुन्हा एकदा डबल डिजिट रिटर्न मिळण्याची दाट शक्यता आहे. ऑटो, बँका आणि भांडवली कॅपिटल गुड्समध्ये 2022 ला चांगली वाढ होईल असेही ते म्हणाले.2021 हे वर्ष भारतीय बाजारपेठेसाठी पुनर्प्राप्तीचे आणि पुढील वाढीसाठी पाया घालण्याचे वर्ष आहे असे शेअर बाजार तज्ज्ञ नवीन कुलकर्णी म्हणाले.
आज आपण या शेअर्सवर पैसै लावले तरआपल्या फायदा होण्याची शक्यता आहे.
आजचे टॉप 10 शेअर्स ?
– आयडिया (IDEA)
– भारत हेवी इलेक्ट्रिकल (BHEL)
– ट्रेंट (TRENT)
– बाटा इंडिया (BATA INDIA)
– पेज इंडिया (PAGEIND)
– हिंदाल्को (HINDALCO)
– टायटन (TITAN)
– अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)
– टाटा मोटर्स (TATA MOTORS)
– कोटक बँक (KOTAKBANK)
सुचना : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.