फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे शेअर्स जोराने कोसळले
Shares of food delivery platform Zomato

वेगवान नाशिक
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्समध्ये मंगळवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सुरूवातीला इंट्रा डेमध्ये कंपनीचे शेअर्स ५.३६ टक्क्यांनी घसरल्याचं दिसून आलं. अखेकच्या सत्रात कंपनीचे शेअर्स ६.७२ टक्क्यांनी घसरून ६५.२० रुपयांवर आले. झोमॅटोच्या ब्लिंकिटच्या अधिग्रहणाबाबतच्या वृत्तानंतर कंपनीचे शेअर्स जबरदस्त आपटल्याचं पाहायला मिळालं.Shares of food delivery platform Zomato
मीडिया रिपोर्ट्सनुसार झोमॅटोच्या संचालक मंडळाची १७ जूनला बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत त्याच दिवशी क्विक कॉमर्स कंपनी ब्लिंकिटच्या अधिग्रहणाच्या करारावर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. या डीलवर त्या दिवशी स्वाक्षरीही होऊ शकते. डील अंतर्गत ब्लिंकिटचं व्हॅल्युएशन ७० कोटी डॉलर्स असू शकतं.
हा व्यवहार निश्चित संख्येत झोमॅटोच्या शेअर्सशी निगडित आहे, जो ब्लिंकिटच्या गुंतवणूकदारांना शेअर स्वॅप कराराच्या एका हिस्स्याच्या रुपात होईल.
या डील अंतर्गत झोमॅटोला आपल्या एका शेअरच्या मोबदल्यात ब्लिंकिटचे १० शेअर्स मिळतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लिकिंटच्या गुंतवणूकदारांनाही सहा महिन्यांच्या लॉक इन कालावधीची अपेक्षा आहे. ब्लिंकिटमध्ये यापूर्वीही झोमॅटोनं गुंतवणूक केली आहे. झोमॅटोकडे ब्लिंकिटचा जवळपास १० टक्के हिस्सा आहे.