
बीजनेस बातम्या
मुंबईः ( business batmya ) असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी चांगला परतावा दिला आहे. शेअर बाजार (Share Market) गेल्या काही दिवसात अस्थिर दिसत आहे. मात्र असं असलं तरी काही शेयर चांगली कमाई करत आहे. अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स (Multibagger Stock) आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. असाच एक स्टॉक म्हणजे कैसर कॉर्पोरेशनचा शेअर (Kaiser Corporation share price) आहे. Shares of Rs 2 became Rs 102: 1 lakh became Rs 35 lakh
कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरने अवघ्या 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे. यादरम्यान 2 रुपयांच्या या शेअरने 102 रुपयांची पातळी ओलांडली. या शेअरने 3400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड शेअर प्राईज
या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी रोजी, कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडचा स्टॉक BSE वर 2.92 रुपयांच्या पातळीवर होता. 22 एप्रिल रोजी संपलेल्या ट्रेडिंग आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर 102.40 रुपयांवर बंद झाला. या चार महिन्यांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3,406.85 टक्के परतावा दिला आहे.
जर आपण एका महिन्याच्या रिटर्नवर नजर टाकली तर हा स्टॉक 24 मार्च रोजी 40.80 रुपयांच्या पातळीवर होता. गेल्या आठवड्यात सोमवारी कैसर कॉर्पोरेशनचा शेअर 84.35 रुपयांवर उघडला. म्हणजेच अवघ्या 5 दिवसांत स्टॉकमध्ये 18 रुपयांची उसळी नोंदवली गेली. या कालावधीत स्टॉक 21.40 टक्क्यांनी वाढला आहे.
गुंतवणूकदार बनले श्रीमंत
पर्सनल फायनान्स तज्ज्ञ सांगतात की जर एखाद्या गुंतवणूकदाराने चार महिन्यांपूर्वी कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 2.92 रुपये दराने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर अवघ्या 4 महिन्यांत त्याचे एक लाख रुपये आज 35 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये 40.85 रुपये प्रति शेअर दराने गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 2.50 लाख झाले असते.