इन्वेस्टमेंटशेयर मार्केट

Tata Group 214 रुपयांचा शेअर्स झाला 1,119 रुपयांना, वर्षात 63% परतावा

business batmya

मुंबई : Large return from stock शेअर मार्केट आज शहरातल्या मोठ्या गुंतवूणूकादारापासून ते ग्रामीण मधील छोट्या गुंतवणूकदारांना पर्यंत येऊन पोहोचलेले आहे.  मात्र शेअर्समध्ये ज्यांचा अनुभव चांगला त्याचं अनुकरण इतर गुंतवणूकदार  करतात व त्यातून पैसे कमवितात. शेयर मार्केटचं काय इतर ठिकाणी पण आपण तसा अनुभव घेतो. मात्र पुढच्याला ठेस लागली तर मागचा शहान होतो. तशी ही स्थिती आहे. म्हणून पुढे जाणारा जर वेगात असेल तर आपण त्यामागे वेगाने जातो. हे तसेच आहे.  ( Shares of Rs 214 traded at Rs 1,119, a return of 63% per annum )

दिग्गज गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांनी पुन्हा एकदा टाटा समूहाच्या रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडमधील गुंतवणूक कायम ठेवली आहे. शेअर बाजारातील डिसेंबर 2021 च्या तिमाहीतील दिग्गज गुंतवणूकदारांच्या होल्डिंग्सवर अपडेट्स समोर येत आहेत.

ट्रेंट लिमिटेडच्या शेअर्सवर नजर टाकल्यास, गेल्या एका वर्षात शेअरने सुमारे 63 टक्के परतावा दिला आहे. दमानी हे दिग्गज बाजारातील गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे गुरू असल्याचे सांगितले जाते.दमानी यांनी ऑक्टोबर-डिसेंबर 2021 या तिमाहीत ट्रेंटच्या शेअर्समध्ये त्यांचे 1.5 टक्के होल्डिंग कायम ठेवले आहे.

 ट्रेंटमध्ये गुंतवणूक

ट्रेंट लिमिटेडच्या डिसेंबर 2021 (Q3FY22) तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राधाकृष्ण दमानी यांच्याकडे कंपनीत 1.52 टक्के (54,21,131 शेअर्स) आहेत. BSE वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ही माहिती समोर आली आहे.

दमानी यांनी त्यांच्या डेरिव्ह ट्रेडिंग अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून ट्रेंटमध्ये गुंतवणूक केली आहे. 11 जानेवारी 2022 रोजी ट्रेंटमध्ये दमानी यांची होल्डिंग 598.6 कोटी रुपये होती.

Trent: 1 वर्षात 63% स्टॉक परतावा

शेअर्स मार्केट अशी जागा आहे की ज्या ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतर त्याचा परतावा इतर सगळ्यांच्या तुलनेत खूप जास्त व  मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे सगळ्यांचा कल जो आहे तो सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर आहे. कारण  भारतात काय पण जगातील कोणतीचं बॅंक एवढा परतावा देत नाही. यात महत्वाचे म्हणजे शेयर मार्केट मध्ये धोका असतो, पण इतर लोक यातून चांगला फायदा  करत असल्यामुळे गुंतवणूकीचे प्रमाण पण वाढतं चालले आहे.  ट्रेंट लिमिटेड टाटा समूहाचे रिटेल युनिट चालवते. त्याची मार्केट कॅप सुमारे 38 हजार कोटी आहे. हा शेअर गेल्या 5 वर्षांत मल्टीबॅगर ठरला आहे झाले आहे. गेल्या पाच वर्षांत या शेअरने 422 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. शेअरची किंमत 214 रुपये (13 जानेवारी 2017) वरून 1,119 रुपये (11 जानेवारी 2022) पर्यंत आली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!