महाराष्ट्र

शिवाजी महाराजांची वाघ नखे परत येणार, लंडन ने चोरली होती का?

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध करण्यासाठी जे वाघनखं वापरली होती. ते वाघनखं ब्रिटनमधून भारतात परत आणण्यात येणार आहेत. ही वाघनखं सध्या ब्रिटनच्या ‘व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट’ या संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. ही वाघनखं परत द्यावीत, याची मागणी बऱ्याच दिवसांपासून केली जात होती. या मागणीला ब्रिटनमधील अधिकाऱ्यांनी मंजूरी दिली असून वाघनखं परत आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार लवकरच एक करार करणार आहे.

वाघनखं ब्रिटनला गेली कशी

महाराष्ट्र सरकार शिवाजी महाराजांची वाघनखं आणि तलवार राज्यात परत आणणार आहे. परंतु महाराजांनी वापरलेली वाघनखं ब्रिटनला गेली कशी, असा प्रश्न पडतो. त्यामागे पण एक रंजक इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं ही लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत. या संग्रहालयात हे वाघनखं गेली कशी यांचा इतिहास जाणून घेऊ.

कोण आहे जेम्स ग्रँड डफ

ब्रिटनच्या संग्रहालयात ही वाघनखं आणली ‘ जेम्स ग्रँड डफ’ या इंग्रजी लेखकाने. साताऱ्याच्या संस्थानात डफला १८१८ मध्ये राजकीय संबंध पाहण्यासाठी नेमण्यात आले होते. जेम्स ग्रँड डफ हा इ.स. १८१८ ते १८२४ च्या दरम्यान सातारातील ईस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून काम करत होता. छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि ईस्ट इंडिया कंपनीमधील संबंधाचे राजकीय व्यवहार तो पाहत असल्याचा दावाही अनेक ठिकाणी करण्यात आलाय.

यासाठी मुनगंटीवार यांच्यासह प्रधान सचिव सांस्कृतिक डॉ. विकास खर्गे आणि राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे हे लंडनमधील व्ही. अँड ए. आणि इतर संग्रहालयांना भेट देतील, असे सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केलेल्या सरकारी ठरावात म्हटले आहे. या ठरावानुसार, तीन सदस्यीय टीमच्या २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यानच्या सहा दिवसीय दौऱ्यासाठी महाराष्ट्र सरकार सुमारे ५० लाख रुपये खर्च करणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!