HDFC च्या ग्राहकांना झटका, कर्जदारांच्या हप्त्यात होणार वाढ

Buisness Batmya
मुंबईः सध्या खासगी क्षेत्रात असणा-या सर्वात मोठ्या कर्ज देणाऱ्या HDFC बँकेनं रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर होण्याआधीच आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एचडीएफसी बँकेनं MCLR ०.३५ टक्क्यांनी वाढवला असून, बॅंकेकडून ७ जून २०२२ पासून नवीन कर्जदर लागू झाला असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.Shock to HDFC customers, increase in borrowers’ installments
त्यामुळे एक महिन्यासाठीचा एमसीएलआर वाढून ७.५५ टक्के आणि तीन महिन्यांसाठी ७.६० टक्के इतका झाला आहे. म्हणूनच एचडीएफसी बँकेसोबतच कॅनरा आणि करूर वैश्य बँकेनं देखील कर्जदरात वाढ केली आहे.
एलआयसीच्या शेअरमध्ये घसरण सुरुच, गुंतवणुकदारांना 94 हजार कोटी रूपयांचा फटका
दरम्यान HDFC या बँकेने एका आठवड्यात दुसऱ्यांदा कर्जदरात वाढ केली असून, याआधी बँकेने १ जून २०२२ रोजी गृहकर्जाच्या रिटेल प्राइम लेंडिंग रेटमध्ये ५ बेसिस पॉइंट्सची वाढ केली होती. त्यामुळे या MCLR मध्ये वाढ झाल्याचा परिणाम प्रत्येक प्रकाराच्या कर्जावर दिसत असून त्यात होम, ऑटो आणि इतर सर्व प्रकराच्या कर्जदरात वाढ होत आहे.
त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेनं एका वर्षाच्या मुदतीतील मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये ०.०५ टक्के वाढ करून ७.४० टक्के इतका कर्जदर केला असल्याने बँकेने सहा महिन्याच्या मुदतीसाठी एमसीएलआरमध्येही वाढ करत ७.३० टक्क्यावरुन ७.३५ टक्के इतका केला आहे.