भारतात सेमीकंडक्टर चीपचा तुटवडा, वाहन उद्योगाला मोठा फटका

buisness batmya
सध्या भारतात सेमीकंडक्टर चीपचा तुटवडा असून, याचा मोठा फटका हा भारतीय वाहन उद्योगाला बसत आहे. त्यामुळे ऑटो सेक्टरच्या समस्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यातच आधीच भारतात सेमी कंडक्टरचा तुटवडा असून, हा तुटवडा भरून काढण्यासाठी चीनकडून सेमीकंडक्टरची आयात करण्यात येत होती. मात्र चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना संकट वाढले आहे. त्यामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा आयात प्रभावित झाली आहे. तसेच ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशन (FADA)ने सादर केलेल्या आकडेवारीनुसार सेमीकंडक्टरच्या तुटवड्याचा मोठा फटका हा वाहन उद्योगाला बसला आहे.Shortage of semiconductor chips in India, a major blow to the automotive industry
या उद्योगामध्ये देशातंगर्त वाहनाच्या विक्रीमध्ये 4.87 टक्क्यांची घट झाल्याने गेल्या मार्च महिन्यात देशांतर्गत प्रवासी वाहनाची एकूण विक्री 2 लाख 71 हजार 358 युनिट एवढी होती. तर मार्च 2021 मध्ये प्रवासी वाहनाची विक्री 2 लाख 85 हजार 240 युनिट एवढी होती. त्यामुळेच वाहनाच्या विक्रीमध्ये हजारो युनिटने घट झाली आहे.
Stock market या दोन शेयर्समुळे झुनझुवालांना मिळाले बेफाम पैसे
चीनमध्ये पुन्हा निर्माण झालेले कोरोना संकट आणि रशिया-युक्रेनमध्ये होणा-या युद्धाचा वाहन विक्रीवर मोठा परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे गेल्या मार्च महिन्यात दुचाकींच्या विक्रीमध्ये देखील मोठी घट झाली आहे. तसेच या दुचाकींच्या विक्रीमध्ये 4.02 टक्क्यांची घसरण झाली असल्याचे पहायला मिळाले आहे. म्हणूनच गेल्या महिन्यात देशांतर्गत केवळ 11 लाख 57 हजार 681 दुचाकींचीच विक्री झाली आहे. तसे ग्रामीण भागात दुचाकी खरेदी करण्याचे प्रमाण अधिक असते. परंतु काही दिवसांपासून ग्रामीण अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीमध्ये दिसत नसल्याने, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. यामुळेच मोठा फटका हा दुचाकी व्यवसायाला बसत आहे.
पेट्रोल -डिझेल स्वस्त होणार ? केंद्राने आखला हा प्लॅान
गेल्या मार्च महिन्याप्रमाणेच फेब्रुवारी महिना देखील वाहन उद्योगाला म्हणावा तितका चांगला नसल्याने, फेब्रुवारी महिन्यात वाहन विक्रीमध्ये तब्बल 6.3 टक्क्यांची घसरण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात 6.3 टक्क्यांच्या घसरणीसह एकूण 17.91 लाख यूनिटच वाहनांची विक्री झाली आहे. तसेच हेच प्रमाण फेब्रुवारी 2021 मध्ये 21.77 लाख यूनिट एवढे असल्याने प्रवासी कारच्या विक्रीत देखील 6.3 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर फेब्रुवारी 2022 मध्ये केवळ 1.67 लाख प्रवासी कारची विक्री झाली आहे.