आर्थिक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये महत्त्वपूर्ण व्यापारी करार

Bussness batmya

नवी दिल्लीः भारत आणि ऑस्ट्रेलियामधील आर्थिक संबंधांना चालना देण्यासाठी शनिवारी आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या वस्तूंवर कोणताही टॅक्स आकारण्यात येणार नसल्याने भारताचा मोठा फायदा होणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री (Commerce and Industry Minister) पीयूष गोयल आणि ऑस्ट्रेलियाचे व्यापार , पर्यटन आणि गुंतवणूक मंत्री डॅन तेहान यांनी एका ऑनलाईन कार्यक्रमादरम्यान हा करार केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसनही उपस्थित होते. या करारानुसार ऑस्ट्रेलिया भारतामधून निर्यात होणाऱ्या कापड (Textile),चामडे, दागिने आणि क्रीडा उत्पादनांसह 95 पेक्षा अधिक वस्तुंना टॅक्समुक्त करणार आहे. Significant trade agreements between India and Australia

काय म्हणाले मोदी?

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले की, आम्ही भारतासोबत करार केला याचा आम्हाला आनंद वाटतो. हा करार भारतासोबत आमचे मैत्रीपूर्ण असलेले संबंध आणखी मजबूत करेल. यावेळी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, हा भारत आणि ऑस्ट्रेलियासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. या कराराच्या माध्यमातून भारत आणि ऑस्ट्रेलियामधील व्यापाराला आणखी चालना मिळेल.हा करार महत्त्वपूर्ण असून, तो पुढील पाच वर्षांत ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यानचा व्यापार 45 ते 50 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्यास मदत करेल असे त्यांनी म्हटले आहे.

याला होईल  फायदा

संबंधित उत्पादन टॅक्स फ्री करण्यात आल्यामुळे ऑस्ट्रलियातून या वस्तूंची निर्यात आणखी वाढू शकते. त्याचा थेट फायदा हा कापड, चामडे, दागिने, खेळाचे साहित्य, विविध मशनरी आणि इलेक्ट्रिक सामान या क्षेत्रातील कंपन्यांना होणार आहे. यातून भारत आणि ऑस्ट्रेलियामधील व्यापाराला चालना मिळेल.या करारानुसार भारतामधून निर्यात होणाऱ्या कापड चामडे, दागिने आणि क्रीडा उत्पादनांसह 95 पेक्षा अधिक वस्तूंना कोणताही टॅक्स लागणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!