Dearness Allowance : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ होण्याची शक्यता

business batmya
नवी दिल्लीः सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तज्ञांच्या मते जानेवारी 2022 मध्येही महागाई भत्त्यात 3% वाढ केली जाणार आहे.
म्हणजेच, जर 3% वाढ झाली तर एकूण DA 31% वरून 34% पर्यंत वाढू शकतो. AICPI डेटानुसार, सप्टेंबर 2021 पर्यंतची आकडेवारी आता बाहेर आली आहे. त्यानुसार, महागाई भत्ता (DA) 32.81 टक्के आहे.
जून 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, जुलै 2021 च्या महागाई भत्त्यात 31 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच, आता त्याच्या पुढील आकडेवारीनुसार, महागाई भत्ता मोजला जाईल आणि त्यात चांगली वाढ होऊ शकते.
केंद्र सरकार जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये महागाई भत्याची रकम जमा करणार होती. कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी थकीत रकम जमा होणार आहे . ३१ लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी २०२२ मध्ये वाढवला जाणार आहे. मात्र, त्याची घोषणा फेब्रुवारीमध्ये होईल. महागाई भत्त्याची गणना AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीच्या आधारे केली जाते. नोव्हेंबर २०२१ पर्यंतची आकडेवारी आली आहे. डिसेंबरचा आकडा जानेवारी २०२२ च्या शेवटी येईल.
त्यानंतर पुढील महागाई भत्ता किती वाढणार हे स्पष्ट होईल. त्यानंतरच सरकार त्याची घोषणा करेल आणि मंत्रिमंडळाकडून मंजुरी दिली जाईल. नोव्हेंबर 2021 पर्यंतच्या आकडेवारीत हे स्पष्ट झाले आहे की जानेवारी 2022 मध्ये महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढू शकतो. म्हणजे एकूण DA 32.81 टक्के असू शकतो.