शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 465 अंकांची उसळी तर निफ्टी 17,500 पार

buisness batmya
नवी दिल्ली: आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली. 12 एप्रिलनंतर निफ्टी प्रथमच 17,500 च्या वर बंद झाला. तर आजच्या व्यवहारात ऑइल-गॅस, आयटी वगळता बीएसईच्या सर्व सेक्टर इंडेक्समध्ये वाढ झाली, तर मेटल, एनर्जी, ऑटो शेअर्समध्ये वाढ झाली.
तसेच व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 465.14 अंकांच्या किंवा 0.80 टक्क्यांच्या वाढीसह 58,853.07 वर बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 127.60 अंकांच्या किंवा 0.73 टक्क्यांच्या वाढीसह 17,525.10 वर बंद झाला.
गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, या बँका देतात सर्वात स्वस्त गृहकर्ज
तर आजच्या व्यवहारात एम अँड एम, कोल इंडिया, बजाज फिनसर्व्ह, हिंदाल्को इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. तर बीपीसीएल, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि नेस्ले इंडिया हे निफ्टीचे सर्वाधिक नुकसान करणारे होते. तसेच शेवटच्या सत्रात बाजारात अस्थिरता दिसून आली, परंतु व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स-निफ्टी थोड्या वाढीसह बंद झाले.
व्यवहाराअंती सेन्सेक्स ८९.१३ अंकांच्या म्हणजेच ०.१५ टक्क्यांच्या वाढीसह ५८,३८७.९३ वर बंद झाला. तर निफ्टी 15.50 अंकांच्या किंवा 0.09 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 17,397.50 वर बंद झाला.
या शेअरने गुंतवणूकदारांचे 1 लाखाचे झाले 1 कोटी