शेयर मार्केट

शेअर मार्केट : शेअर बाजार तेजीत बंद, सेन्सेक्स 21 अंकांनी वधारला, तर निफ्टीत किंचित वाढ

Buisness Batmya

दिल्लीः गेल्या 4 सत्रांतील तेजी कायम ठेवत मंगळवारी शेअर बाजार हिरव्या चिन्हावर बंद झाला. आज बाजारात बरीच अस्थिरता होती पण शेवटी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही हिरव्या चिन्हावर बंद झाले. सेन्सेक्स 21 अंकांच्या वाढीसह 58,136 वर बंद झाला. तर निफ्टी 5.40 अंकांच्या वाढीसह 17,345 वर बंद झाला.

क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास, निफ्टी बँक, ऑटो, एफएमसीजी, फार्मा आणि बँक यांनी चांगली कामगिरी केली, तर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, आयटी, मीडिया आणि मेटल यांनी खराब कामगिरी केली.

Kia Seltos नवीन अवतारात बाजारात येण्यास सज्ज, पहा काही खास वैशिष्ट्य

तसेच निफ्टीमध्ये इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि मारुती सर्वाधिक वाढले. तर दुसरीकडे, यूपीएल, हिरो मोटोकॉर्प, एसबीआय लाईफ, ब्रिटानिया आणि हिंदाल्को आज सर्वाधिक घसरले.

शेवटच्या सत्रात व्यवहार संपल्यावर सेन्सेक्स ५४५.२५ अंकांच्या किंवा ०.९५ टक्क्यांच्या वाढीसह ५८,११५.५० वर बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 181.80 अंकांच्या किंवा 1.06 टक्क्यांच्या वाढीसह 17,340.05 वर बंद झाला.

Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात, मिळेल 5020mAh बॅटरी

 

 

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!