शेयर मार्केट

शेअर मार्केट : शेअर बाजार तेजीत बंद, सेन्सेक्स 284 अंकांनी वधारला

Buisness Batmya

नवी दिल्ली:   शेअर बाजारातील तेजीचा टप्पा सुरूच आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सलग पाचव्या दिवशी वधारत बंद झाले. तर मिडकॅप, स्मॉलकॅप समभागात तेजी दिसून आली. दुसरीकडे बँकिंग, एफएमसीजी, मेटल शेअर्समध्ये खरेदी झाली. आयटी, ऑटो, एनर्जी समभाग वधारले. व्यवहाराअंती  सेन्सेक्स २८४.४२ अंकांच्या म्हणजेच ०.५१ टक्क्यांच्या वाढीसह ५५,६८१.९५ वर बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 84.40 अंकांच्या किंवा 0.51 टक्क्यांच्या मजबूतीसह 16,605.25 वर बंद झाला.

Top Gainer आणि Loser
IndusInd बँक, बजाज फायनान्स, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, यूपीएल आणि बजाज फिनसर्व्ह हे आजच्या व्यवसायात निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले तर डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज, कोटक महिंद्रा बँक, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, सिप्ला आणि टेक महिंद्रा हे टॉप लूजर होते.

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

तसेच शेवटच्या सत्रात म्हणजेच बुधवारी व्यवहार संपल्यावर सेन्सेक्स 629.91 अंकांच्या किंवा 1.15 टक्क्यांच्या वाढीसह 55397.53 वर बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 180.30 अंकांच्या किंवा 1.10 टक्क्यांच्या वाढीसह 16520.80 वर बंद झाला.

क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये घसरण: अनेक नाण्यांमध्ये 10% पेक्षा जास्त घसरण

FICCI ने भारताच्या वाढीचा अंदाज 7 टक्क्यांवर आणला
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री  ने इकॉनॉमिक आउटलुक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या निकालांच्या आधारे, FICCI ने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP वाढीचा अंदाज 7.4 टक्‍क्‍यांच्या आधीच्या अंदाजापेक्षा 7 टक्क्यांवर आणला आहे. सध्याच्या भू-राजकीय अनिश्चिततेचा परिणाम भारताच्या वाढीवर दिसू शकतो, असे फिक्कीचे म्हणणे आहे.

तर वार्षिक आधारावर, PVR ने तोट्यातून नफा मिळवला असून  पीव्हीआरच्या स्टॉकनेही कंपनीच्या उत्कृष्ट निकालांना सलाम केला आहे. कंपनीने निकाल जाहीर केल्यानंतर या शेअरमध्ये वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीला 53 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

Google Pixel 6A स्मार्टफोन भारतात लॉन्च, किमत किती पहा

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!