या बँकांमध्ये FD वर मिळणार जोरदार परतावा

Buisness Batmya
नवी दिल्लीः बँकांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याची प्रक्रिया नवीन वर्षातही सुरूच असून आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर गेल्या वर्षभरात बहुतांश बँकांनी व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. IBI ने मे 2022 मध्ये रेपो रेट वाढवण्यास सुरुवात केली आणि आतापर्यंत मध्यवर्ती बँकेने 2.25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे बँका व्याजदरात सातत्याने वाढ करत आहेत. तर
नवीन वर्षातही काही बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.चला तर पाहूया त्या बँकांबद्दल ज्यांनी 2023 मध्ये FD वर व्याज वाढवले आहे.
या म्युच्युअल फंडाने गुंतवणुकदारांना दिला जोरदार परतावा
पंजाब नॅशनल बँक- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंजाब नॅशनल बँकेने बचत खाते आणि एफडीवरील व्याजदरात वाढ केली असून PNB ने बचत खात्यावरील 100 कोटी किंवा त्याहून अधिक ठेवींवर 0.25 टक्के व्याज वाढवले आहे. त्याच वेळी, बँकेने एफडीवरील व्याज 0.50 टक्क्यांनी वाढवले आहे.
पंजाब आणि सिंध बँक- पंजाब आणि सिंध बँकेनेही नवीन वर्षात 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली असून बँक 601 दिवसांच्या एफडीवर 7 टक्के व्याज देत आहे.
इंडियन ओव्हरसीज बँक- 2023 वर्ष सुरू होताच, 1 जानेवारी रोजी, इंडियन ओव्हरसीज बँकेने 7 ते 90 दिवसांच्या कालावधीसह FD वर व्याज वाढवले होते. त्यात बँक ४४४ दिवसांच्या FD वर कमाल ६.५५ टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना कमाल 0.50 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 0.75 टक्के व्याज देत आहे.
LIC च्या या योजनेत तुम्हाला दरमहा इतके हजार रूपये मिळणार, जाणून घ्या
कोटक महिंद्रा बँक- कोटक महिंद्रा बँकेने 4 जानेवारी 2023 रोजी एफडीवरील व्याजदरात 0.50 टक्के वाढ केली आहे. कोटक बँक आता Rs 390 ते 2 वर्षांपर्यंतच्या FD वर 7% व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ७.५० टक्के व्याज दिले जात आहे.
बंधन बँक- नवीन वर्षात बंधन बँकेने 5 जानेवारीला एफडीवरील व्याजातही वाढ केली असून ही बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी एफडी ऑफर करते. बंधन बँक आता ३ टक्के ते ५.८५ टक्के व्याज देत असून ज्येष्ठ नागरिकांना 3.75 टक्के ते 6.60 टक्के व्याजाची ऑफर. बँक ६०० दिवसांच्या एफडीवर ७.५० टक्के व्याज देत आहे.
येस बँक- येस बँकेने ३ जानेवारी २०२३ रोजी २ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजात वाढ केली आहे. बँक सर्वसामान्य नागरिकांना ७ दिवसांपासून १२० महिन्यांपर्यंतच्या ठेवींवर ३.२५% ते ७.००% व्याज देत आहे. तर सर्वसामान्य नागरिकांना कमाल ७.५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ८ टक्के व्याज देत आहे. कर्नाटक बँक-2023 च्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला कर्नाटक बँकेनेही FD वर व्याज वाढवले. ही बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी FD देखील देत आहे. दुसरीकडे, बँकेच्या व्याजदराबद्दल बोलायचे तर, ती 5.25 टक्के ते 5.80 टक्के व्याज देत आहे. बँक ५५५ दिवसांच्या एफडीवर ७.३० टक्के व्याज देत आहे.
Gold Price Today खरेदी करण्यापूर्वी आजचा सोने चांदीचा दर पहा