फक्त 20 हजारात घेऊन जा मारुतीची ही कार

business batmya
स्पर्धेतील आपली आघाडी कायम ठेवण्यासाठी मारुती सुझुकी कंपनीनेही कंबर कसली असून, आक्रमकपणे नवीन उत्पादनांवर काम करत आहे.भारतीय बाजारपेठेतील स्पर्धा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेकविध कंपन्या आपली नवीन उत्पादने लॉंच करताना पाहायला मिळत आहेत.
अलीकडेच मारुतीने आपली सर्वाधिक विकली जाणारी WagonR कार CNG पर्यायात सादर केली आहे. यावर मारुतीकडून भन्नाट ऑफर दिली जात आहे.मारुती कंपनी आताच्या घडीला पारंपारिक इंधन पर्यायांसह CNG कारवरही मोठ्या प्रमाणावर भर देत आहे.
भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीची सीएनजी गाड्यांची डिमांड सध्या जबरदस्त आहे. वेगनआर वर २ ते ३ महिन्यांचा वेटिंग पीरियड सुरू आहे. वेगनआर आजही सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या सीएनजी गाड्यांपैकी एक आहे.
Maruti Wagon R facelift मध्ये १.० लीटरचे के सीरीज ड्युअल जेट आणि ड्युअल व्हीव्हीटी इंजिनचा वापर करण्यात आला आहे. यात १.२ लीटरचे इंजिनचा ऑप्शन दिला आहे. यासोबतच कंपनीने याला फॅक्ट्री फिटेड सीएनजी किट सोबत बाजारात उतरवले आहे.
Wagon R CNG मध्ये १.० लीटरचे इंजिनचा वापर करण्यात आला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, वेगन आर फेसलिफ्टचे नवीन सीएनजी व्हेरियंट ३४.०५ किमी प्रति किलोचे मायलेज देते. या स्मार्टफोन नेव्हिगेशन सोबत ७ इंचाचा स्मार्टप्ले स्टूडिओ इंफोटेनमेंट सिस्टम दिले जात आहे. जे ४ स्पीकर सोबत येते.
नवीन वेगनआर HEARTECT प्लेटफॉर्म सोबत आपल्या रायडर्ससाठी जबरदस्त सेफ्टी मेजर्स ऑफर करते. यात ड्युअल एअरबॅग, अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्यूशन, फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर, हाय स्पीड अलर्ट सिस्टम आणि रियर पार्किंग सेन्सर सह अनेक सेफ्टी फीचर्स दिले आहेत.
Maruti Suzuki LXI WagonR CNG मॉडलची किंमत ६.३४ लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. तुम्ही जर या कारला २० हजार रुपये डाउन पेमेंटवर खरेदी करू शकता. ईएमआय कॅलक्यूलेटरनुसार, ७ वर्षासाठी ८ टक्के व्याज या दराने तुम्हाला दर महिना ईएमआय १० हजार ७३२ रुपये द्यावा लागेल. तसेच तुम्हाला ७ वर्षात २ लाख १२ हजार ९५९ रुपये व्याज द्यावे लागेल.
Maruti Suzuki LXI WagonR CNG वर मिळणारे लोन, डाउन पेमेंट आणि व्याज दर तुमच्या बँकिंग आणि सिबिल स्कोर वर अवलंबून आहे. तुमचा नेगिटिव्ह रिपोर्ट कसा येतो. ते पाहून बँक काही बदल करू शकतात.
Maruti Suzuki LXI WagonR CNG च्या सर्व व्हेरिएंटची योग्य माहिती आणि त्यावरील ऑफर जाणून घेण्यासाठी जवळच्या मारुती सुझुकीच्या शोरुमला भेट द्यावी, असे सांगितले जात आहे. मारुतीची कार खरेदी करण्याआधी तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशीपकडे जाऊन सविस्तर माहिती करून घेऊ शकता. त्यानंतर खरेदी करू शकता.