उद्योग / व्यवसाय

टाटा-अदानी ग्रुपचे ‘हे’ शेअर्स करतायत मालामाल, एका महिन्यात पैसे डबल

buisness batmya

सध्या शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत टाटा- अदानी हे शेअरच्या बाबतीत नंबरवन उद्योगपती आहे. त्यात ते शेअर्स मध्ये गुंतवणुकदारांचे एका महिन्यात डबल पैसे करत असून दुप्पट रिटर्न देत आहे. त्यामुळे अदानी पॉवरचा शेअर मंगळवारी पाऊणे 11 वाजेपर्यंत एक महिन्यात 121.80 रुपयांवरून 231.50 रुपयांवर पोहोचला असून, या काळात या शेअरने तब्बल 90.23 टक्क्यांची उसळी घेतली आहे.Tata-Adani Group’s ‘Hey’ shares goods, double the money in a month

तर गेल्या महिनाभरात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे डबल करणाऱ्या मिड कॅप आणि लार्ज कॅप स्टॉक्सपैकी तीन स्टॉक्स एकट्या अदानी समुहाचे असल्याने अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी पॉवरने केवळ एका महिन्यातच आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत. त्यामध्ये टाटा समूहाच्याही एका कंपनीने एका महिन्यात 83 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. त्यामुळे ही एक आश्चर्यचकित करणारी झेप आहे.

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

एलआयसी पॅालिसाीत गुंतवणुक करत असाल तर मिळणार 20 लाख रूपये

त्यानंतर अदानी समूहाचा दुसरा स्टॉक म्हणजे, अदानी विल्मर आहे. तर आपल्या लिस्टिंग प्राइसच्या तुलनेत या स्टॉकची किंमत जवळपास अडीच पट वाढली असून, या स्टॉकनेही एक महिन्यात तब्बल 74 टक्के रिटर्न दिले आहेत. त्यामुळे 11 वाजे दरम्यान हा स्टॉक 599 रुपयांवर होता. तसेच टाटा ग्रुपची कंपनी फक्त एकाच महिन्यात जबरदस्त नफा मिळवून देणाऱ्या स्टॉक्समध्ये दुसरे नाव आहे. त्यामुळे दूरसंचार क्षेत्रातील या कंपनीने गेल्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 83 टक्क्यांहून अधिकचा रिटर्न दिला आहे. तर आज टीटीएमएलच्या शेअरची किंमत 108.25 रुपयांवरून 198.75 रुपयांवर पोहोचली आहे.

त्यासाठी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून देणाऱ्या कंपन्यांच्या स्टॉक्सच्या यादीत ब्राइटकॉम समूह चौथ्या क्रमांकावर असल्याने या कंपनीचा शेअर एकाच महिन्यात 58.35 रुपयांवरून 96.90 रुपयांपर्यंत वधारला आहे. त्यामुळे चांगला नफा मिळवून देण्यात पुन्हा एकदा अदानी ग्रुपचेच नाव येते. म्हणूनच अदानी टोटल गॅसनेही गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचा पैसा जवळपास दीड पट वाढवला असून, हा स्टॉक जवळपास 2599.80 रुपयांवर होता, तर तो एक महिना आधी याच्या शेअरची किंमत 1661.85 रुपये एवढी होती.

पेट्रोल-डिझेल सोबत सीएनजीचाही भडका

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!