मोबाईल

8 हजार रुपयांच्या रेंजमध्ये Tecno चा नवीन स्मार्टफोन

business batmya

मुंबई :  अनेक आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर आज हा चीनी कंपनीचा स्मार्टफोन देशात सादर करण्यात आला आहे. Tecno Pop 5 Pro तीन रंगांमध्ये येतो, ज्यात Deepsea Luster, Ice Blue आणि Sky Cyan यांचा समावेश आहे.चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Tecno ने आज भारतात नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ज्याचे नाव Tecno Pop 5 Pro आहे.

HDFC Life Insurance एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सला नफा होऊन उत्पन्न वाढ

इच्छुक खरेदीदार कंपनीच्या वेबसाइट, Amazon आणि Flipkart वरुन हा खरेदी करू शकतील. दरम्यान, कंपनी अद्याप कोणतीही उपलब्धता किंवा विक्रीची (Sale) तारीख उघड केलेली नाही.

स्मार्टफोनला पॉवर देणारा प्रोसेसर अद्याप समोर आलेला नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार हा फोन 3GB RAM आणि 32GB इंटर्नल स्टोरेजसह येईल. Tecno Pop 5 Pro मधील स्टोरेज स्पेस मायक्रोएसडी कार्डद्वारे 256GB पर्यंत वाढवता येईल. यात ड्युअल सिम सपोर्टचाही समावेश आहे.

Suzuki Alto कारची खरेदी करा या भावात..म्हणजे अर्ध्या किमंतीमध्ये

टेक्नो पॉप 5 प्रो ची किंमत
Tecno Pop 5 Pro ची सर्वात आकर्षग बाब म्हणजे त्याची किंमत. स्मार्टफोन निर्माता कंपनीने फोनचं एक व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. त्याची किंमत 8,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे व्हेरिएंट 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेजसह येते. स्मार्टफोनच्या काही प्रमुख फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.52 इंचाचा HD+ डिस्प्ले, वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच, 6,000mAh क्षमतेची बॅटरी, 8 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, 14 प्रादेशिक भाषा, IPX2 रेटिंग, Android 11 Go सपोर्ट यांचा समावेश आहे.

Honda Activa scooter अर्ध्या किमंतीत मिळणार तुमची आवडती स्कूटर

टेक्नो पॉप 5 प्रो चे स्पेसिफिकेशन्स
Tecno Pop 5 Pro मध्ये 6.52 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे ज्याचा टच सॅम्पलिंग रेट 120Hz आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशो 90 टक्के आहे. हा फोन Android 11 Go ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित HiOS 7.6 वर काम करते.

कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Tecno Pop 5 Pro मध्ये 8 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि AI पोर्ट्रेट मोड, HDR मोड आणि सेकेंडरी AI लेन्स समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 5 मेगापिक्सेलचा सेन्सर असलेल्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!