स्वस्तात मस्त OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन भारतात होणार लाँच

buisness batmya
OnePlus Nord 2T 5G भारतात 19 मेला लाँच होणार असून, एका ऑनलाईन इव्हेंटमधून हा डिवाइस भारतात येणार आहे. त्याआधी OnePlus Nord 2T हा स्मार्टफोन युरोपमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला होता. त्यानंतर आता कंपनीने या फोनच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे.The cheapest OnePlus Nord 2T 5G smartphone will be launched in India
OnePlus Nord 2T ची किंमत
OnePlus Nord 2T चा एकच व्हेरिएंट युरोपमध्ये आधी सादर करण्यात आला असून, तिथे याची किंमत 399 यूरो (सुमारे 32,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर भारतीय किंमत ही 25,000 ते 30,000 रुपयांच्या आत असू शकणार आहे.
एलआसी आयपीओ शेअर्सचे आज वाटप होण्याची शक्यता
OnePlus Nord 2T चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus Nord 2T स्मार्टफोन नॉर्ड सीरिजमधील सर्वात प्रीमियम डिवाइस असल्यामुळे यामधे अनेक स्पेक्स अपग्रेड करण्यात आले आहेत. तसेच हा फोन 6.43 इंचाच्या फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्लेसह येतो. जो पंच होल डिजाईनसह 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. आणि हा फोन अँड्रॉइड 12 आधारित ऑक्सिजन ओएस 12.1 वर चालतो. तर प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा डिमेन्सिटी 1300 चिपसेट देण्यात आला असून, सोबत 8GB रॅम आणि 128GB मेमरी मिळत आहे.
Share Market: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1,158 अंकांनी घसरला
या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेन्सर देण्यात आला असून त्यामध्ये एलईडी फ्लॅशसह 50MP Sony IMX766 सेन्सर मुख्य कॅमेरा म्हणून मिळतो. तर हा सेन्सर OIS ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 8MP ची अल्ट्रावाईड लेन्स आणि 2MP चा मोनोक्रोम सेन्सर आहे. आणि पुढचा 32MP चा सेल्फी शुटर आहे. तसेच या OnePlus Nord 2T मध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली असल्याने ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे फक्त 15 मिनिटांत दिवसभराचा बॅटरी बॅकअप मिळतो, असा दावा कंपनीनं केला आहे.