एलआयसी गुंतवणुकदारांना मिळणार खुशखबर, आयुर्विमा महामंडळ करणार ही घोषणा

Buisness Batmay
एलआयसीच्या शेअरधारकांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असेल. एलआयसी बोर्डाची आज बैठक होत आहे. त्यामुळे येणा-या पुढील काळात एलआयसीचा एफपीओ आणण्याची सरकारची योजना असून, शेअरहोल्डर्सला डिविंडंड देण्याचा विचार केला जाणार आहे. तसेच अर्थतज्ज्ञांनुसार एलआयसी गुंतवणूकदारांना चांगला डिविडंड देण्याची घोषणा करणार आहे.The good news for LIC investors is that the Life Insurance Corporation will make the announcement
Share Market: शेअर बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आजचे दमदार 10 शेअर्स
त्यानंतर LIC च्या IPO चा आकार रु. 20,557 कोटी होता आणि तो 2.95 पट सबस्क्राइब झाला होता. परंतु लिस्टिंग झाल्यापासून, त्याची किंमत सतत घसरत असून शुक्रवारी एलआयसीचा शेअर बीएसईवर 1.21 टक्क्यांच्या वाढीसह 821.55 रुपयांवर बंद झाला होता. तर, गुरुवारच्या ट्रेडिंगमध्ये कंपनीचा शेअर 801.55 रुपयांपर्यंत घसरला होता, जो LIC शेअरचा नवा नीचांक आहे.
सध्या, कंपनीचा MCap रुपये 5,19,630.19 कोटी आहे, जो इश्यू किमतीनुसार 6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. यामुळे शेअर बाजारातून सध्यातरी पॉलिसीधारक पैसे कमवू शकत नाहीत. तसेच याआधी एलआयसीने पहिल्या तिमाहीचे निकाल ३० मे रोजी जाहीर केले जातील असे सांगितले, मात्र त्या बोर्डाची बैठक 30 मे रोजी होत आहे. त्यामुळे मार्च तिमाहीचे निकाल विचारात घेतले जाऊन याशिवाय गुंतवणूकदारांना देण्यात येणाऱ्या लाभांशावरही बैठकीत चर्चा होणार आहे, असे यात म्हटले होते. यामुळे आज एलआयसीच्या गुंतवणुकदारांना बंपर फायदा मिळू शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
penny stock १४ रुपयांच्या शेअरनं दिले १६० टक्के रिटर्न