वाहन मार्केट

भारतात सर्वात कमी किमंतीची स्कूटर लॅान्च , कोणीही खरेदी करेल इतकं किमंत

business batmya

नवी दिल्लीः (electric scooters) महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली असल्यामुळे  प्रत्येक जण पेट्रोल आणि डिझेलचे वाढणारे दर पाहून दुचाकीची निवड करतो, मात्र दुचाकीच्या किमंतीही गगनाला भिडत चाललेल्या आहे. सर्वसामान्य माणसासाठी दुचाकी घेणं सोपं असलं तरी त्याला चालवणे अवघड असल्याचे आजची परिस्थिती आहे. कारण भाकरी पेक्षा भोकरे जड ही म्हण सत्यात उतरलेले आहे. कारण दुचाकीसाठीही किमंत प्रचंड मोजावी लागते आणि त्यात तिचे मायलेज जर पाहिले तर खुप कमी आहे.  (The lowest priced scooter launch in India, the most expensive ) पण आता बाजार काही स्कूटर लॅान्च झाल्या आहे. त्यामुळे किमंत पण कमी आणि आणि पेट्रोलची पण गरज नाही. 

सुरुवातील आपण महागड्या बाईक खरेदी करतो. मात्र नंतर नंतर पेट्रोल टाकून आपल्याला वैताग येतो. मात्र पेट्रोलला जर तुम्हाला राम राम करुन स्वस्त दुचाकी खरेदी करायची असेल तर तुमच्या साठी खुप मोठा पर्याय उपलब्ध झालेला आहे. कारण बाजार अनेक स्कूटर लॅन्च होत असून नुकतीच एक सर्वात कमी किमंती मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर लॅान्च झाली आहे. त्या स्कूटरची किमंत  खुप स्वस्त आहे. याच बरोबर अनेक बाजारातील स्कूटर तुमच्या फायद्याच्या ठरतात ते तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे.

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

येथे देण्यात आलेल्या किंमती ऑटो वेबसाइट bikedekho नुसार सर्व आहेत, त्यामुळे त्या वेगवेगळ्या प्रदेशानुसार भिन्न असू शकतात. देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरची (electric scooters) यादी पाहाणार आहोत. त्यांची किंमत सुमारे 30 ते 40 हजार रुपये आहे आणि जे तुम्हाला 60 किलोमीटरपर्यंतची रेंज देतील. मात्र आपण त्यावर अभ्यास करुन त्या खरेदी करु शकतात.

Hero Electric Optima

आपल्याला कमी किमंती मध्ये जर जास्त लांब जाणारी स्कूटर अपेक्षीत असेल तर तुम्ही  ही पण निवडू शकतात. Hero Optima HX इलेक्ट्रिक स्कूटर 1200W इलेक्ट्रिक मोटर आणि 51.2V/30Ah पोर्टेबल बॅटरीसह येते. कंपनीचा दावा आहे की पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 82 किमी पर्यंतची रेंज देते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी तब्बल 5 तास लागतात. तर या स्कूटरचा टॉप स्पीड 42kmph आहे. Hero Electric Optima ची किंमत 55,580 रुपये आहे.

Ampere V48

या स्कूटरचे वैशिष्टे सांगायचे झाले तर  यात 48 V, 20 Ah बॅटरी देण्यात आली आहे, जी पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 50 किलोमीटर चालते.  या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 37,390 रुपये (एक्स-शोरूम) आहे.स्कूटरचा टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे. तर स्कूटर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी तब्बल 8 ते 10 तास लागतात.

Ujaas eGO

अजून कमी किमंत या स्कूटरची आहे. यातील वैशिष्टे सांगायचे झाले तर  यात 250W मोटर आणि 48V-26Ah बॅटरी दिली असून ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6-7 तास लागतात. Ujaas eGO इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 34,880 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

कंपनीचा दावा आहे की फुल चार्ज केल्यावर ती 60 किमी चालू शकते. यात डिजिटल स्पीडोमीटर, अँटी थेफ्ट अलार्म, टेलिस्कोपिक सस्पेंशन (समोर), हायड्रोलिक सस्पेन्शन (मागील) आणि अलॉय व्हीलयांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

एव्हॉन ई लाइट

आता आम्ही जी स्कूटर सांगणार आहे ती सर्वात स्वस्त असून ती एकदा चार्ज केल्यानंतर 60 किमी इतके चालते. स्कूटरचे वजन पण खुप कमी असून स्कूटरमध्ये 48V 12AH बॅटरी आहे. ही बॅटरी चार्ज होण्यासाठी 6 ते 8 तास लागतात. मात्र स्कूटरची शोरुम किमंत फक्त 28000 हजार रुपये आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!