वैयक्तिक कर्ज घेणा-या ग्राहकांच्या संख्येत होतेय दुप्पटीने वाढ

buisness batmya
मुंबई : गेल्या तीन वर्षात कोरोनामुळे रोजगार नसल्याने कर्ज काढून सण साजरे करणा-यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने सणासुदीच्या काळात वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांची संख्या तीन वर्षांपूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. त्यामध्ये कोरोनामुळे कर्ज न फेडू शकणारे ग्राहकांतही वाढ झाली आहे.The number of customers taking out personal loans has doubled
त्यातली त्यात २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या कालावधीत १६,३९३ कोटी रुपयांवरून दुचाकी कर्जाची आकडेवारी १५,२८१ कोटी रुपयांवर घसरली असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या डिसेंबर तिमाहीत, व २०१८-१९ च्या तिमाहीच्या तुलनेत गृह कर्जाचा आकडा ४० टक्क्यांनी वाढून १.९३ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
तसेच यासाठी काढले गेले कर्ज हे वैयक्तिक कर्जा नुसार-१.४७ लाख कोटी २०२१ , ७५ हजार कोटी २०१८ असून,दुचाकींसाठी असणारे कर्ज हे १५,२८१ कोटी २०२१, १६,३९३ कोटी २०१८ , असे होते. तर घरातील वस्तूंच्या खरेदीसाठी घेतलेले कर्ज २६,०७५ कोटी २०२१, व १९,६८३ कोटी २०१८ इतके आहे.
त्यानुसार अहवालात म्हटले की, गत वर्षातील डिसेंबर तिमाहीत ग्राहकांकडून १.४७ लाख कोटींचे वैयक्तिक कर्ज घेण्यात आले असून, ते डिसेंबर २०१८च्या तिमाहीत नोंद करण्यात आलेल्या ७५ हजार कोटींच्या तुलनेत दुप्पट आहे. तसेच डिसेंबरच्या तिमाहीत गृहकर्जासाठी १.९३ लाख कोटी २०२१ असून, ४०% नी वाढ झाली आहे.