पोको एक्स4 जीटी स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच

Buisness Batmya
काही दिवसांपूर्वी Redmi Note 11T Pro आणि Note 11T Pro+ चीनमध्ये लाँच केला गेला आहे. त्यात सध्या पोकोची एक्स सीरिज खूप लोकप्रिय ठरली असून कंपनीनं आता या सीरिजचा विस्तार करण्याची तयारी सुरु केली आहे. तर आता लवकरच भारतीय बाजारात पोको एक्स4 जीटी स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो.The Poco X4 GT smartphone will be launched in India soon
डॉलरच्या तुलनेत रुपया 4.5 टक्कयांनी घसरला, सर्वसामान्यांना बसणार फटका
Redmi Note 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 11T Pro फोनमध्ये 67 वॉट फास्ट चार्ज सपोर्टसह 5080mAh ची बॅटरी आहे. प्रोसेसिंगसाठी यात मीडियाटेकचा डिमेन्सिटी 8100 चिपसेट मिळतो. सोबत 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.
या फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून, जो 144 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच हा फोन डॉल्बी व्हिजन आणि डीसी डिमिंग सपोर्टसह बाजारात आला आहे. त्यात बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा ISOCELL GW1 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 20 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
तुम्ही निवृत्तीची योजना आखत असाल तर कोणती पेन्शन योजना सर्वोत्तम?