शेती

Rain पाऊस वाढणार महाराष्ट्रातील या जिल्ह्यात गारांचा पाऊस

बिझनेस बातम्या

मुंबई, ता. 17 एप्रिल 2024 Rain maharashtra  राज्यात थांबलेला पाऊस पुन्हा वाढला असून आता विदर्भात कमी अन् कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्याने जोर धरला आहे. दरम्यान मध्य व उत्तर महाराष्ट्रात दुपारी उन्हाचा चटका चांगलाच जाणवत असून मंगळवारी मालेगाव येथे पारा 42 अंशांवर गेला. मराठवाडा ते कर्नाटकपर्यंतच्या भागात समुद्र सपाटीपासून 9 कि.मी. उंचीवर वार्‍यांची द्रोणीय रेषा तयार झाली आहे. त्यामुळे विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत मंगळवारी वादळी वारे, गारांचा पाऊस झाला. दिवसभर उन्हाची तलखी होती. तर सायंकाळी मात्र गारांचा पाऊस झाल्याने हायसे वाटावे असे वातावरण बहुतांश भागात होते. राज्यातील सर्वच भागात 20 एप्रिलपर्यंत पावसाचा मुक्काम वाढला आहे.

जोरदार पावसाची शक्यता असलेले जिल्हे

पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, नाशिक, बीड, हिंगोली, अहमदनगर आणि मुंबई.

असे आहेत यलो अलर्ट-

कोकण : 17 ते 20 एप्रिल
मध्य महाराष्ट्र : 17 व 18 एप्रिल
मराठवाडा : 17 व 18 एप्रिल
विदर्भ :- अलर्ट नाही.
मालेगाव 42.6, पुणे 40.8, लोहगाव 40.7, अहमदनगर 40.8, जळगाव 41.5, कोल्हापूर 39.1, महाबळेश्वर 33, मालेगाव 42.6, नाशिक 40.4, सांगली 39.6, सातारा 40.1, सोलापूर 40.6, धाराशीव 39.5, छत्रपती संभाजीनगर 39.3, परभणी 39.5, नांदेड 38.6, अकोला 41, अमरावती 39.4, बुलढाणा 39.8, ब्रम्हपुरी 39.8, चंद्रपूर 40, गोंदिया 37, नागपूर 37.

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!