शेयर मार्केट

stock market आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेयर्स मार्केट कोसळले

business batmya

मुंबईः tock Market:  शेअर बाजार सुरू होताच घसरण झाल्याने गुंतवणुकदरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 450 अंकांनी घसरला. तर, एनएसईचा 50 स्टॉकचा इंडेक्स निफ्टी 143.10 अंकांनी घसरला.

प्री-ओपनिंगमध्ये बाजार कसा होता

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

आज निफ्टी 37 अंकांच्या घसरणीसह 16937.80 वर व्यवहार करताना दिसत आहे. याशिवाय SGX निफ्टीमध्येही 65 अंकांची घसरण झाली. आज बाजार स्थिरावण्यापूर्वीच बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. एवढचं नाही तर  प्री-ओपनिंगमध्ये, बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 175.98 अंकांनी किंवा 0.31 टक्क्यांनी घसरून 56,948.33 वर व्यवहार करताना दिसत आहे.

बाजारातील चढ उतार

आज निफ्टीमध्ये फार्मा शेअर्समध्ये तेजी दिसत आहे आणि औषध कंपनी सिप्लाचा शेअर दर 1.5 टक्के वधारला.
त्याशिवाय, सन फार्मा, पॉवर ग्रीड, एनटीपीसीच्या शेअर दरात वाढ झाली. निफ्टीमधील वधारणाऱ्या स्टॉकची संख्या फक्त 7 असून 43 स्टॉक घसरले आहेत.

हे शेअर जास्त घसरले

शेअर बाजार सुरू होताच घसरण नोंदवण्यात आली. इंडसइंड बँक 4.71 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे आणि बजाज फायनान्स 1.79 टक्क्यांनी घसरला आहे. बजाज फिनसर्व्ह 1.46 टक्क्यांनी आणि आयशर मोटर्स 1.18 टक्क्यांनी घसरला आहे.

बँक निफ्टीमध्ये जोरदार घसरण

बँक निफ्टीचे बहुतांश शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत आणि त्यात ३६४.५५ अंकांची किंवा १.०५ टक्क्यांची घसरण झाली आहे.बँकिंग स्टॉक्समध्ये झालेल्या घसरणीचा बाजारावर मोठा परिणाम झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!