Daily News
नाशिक जिल्ह्यात मोठा अपघात ट्रॅक्टरखाली दाबल्या महिला
Big accident in Nashik district, women crushed under tractor

बिझनेस बातम्या
नाशिक, ता. 26 आॅक्टोबर 2024 : दहेगाव येथील आण्णा साळुबा कर्नल यांच्या शेतात काम करण्यासाठी आज सकाळी नांदगाव शहरातील दत्तनगर आणि नेहरु नगर गंगाधरी येथील मजुरांना दहेगावला घेऊन जाणारा ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली नाल्यात पलटी झाला.
ट्रॅक्टरच्या पुढे बसलेल्या महिला मजूर आशाबाई चंद्रभान त्रिभुवन वय ६५ रा..नेहरुनगर, नांदगाव, व ताराबाई रविंद्र भवर वय ४० रा.दत्तवाडी गंगाधरी नांदगाव या जागेवरच ठार झाल्या.
अरुण दशरथ यशवंते हे जखमी झाले आहेत. ट्रक्टर चालक शिंदे व इतर महिला मजूर बचवल्या आहे. नांदगावचे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी तातडीने अपघाताची माहिती घेतली.
ट्रँक्टरवर सहा मजूर बसले होते नांदगांव दहेगांव रोडवर हि घटना घडली. या ठिकाणी रस्तादेखील ठिक ठिकाणी खराब आहे .