पुढील आठवड्यात या 2 नवीन कार भारतात होणार दाखल
Buisness Batmya
नवी दिल्ली- ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी जुलै महिना अत्यंत उत्साही असणार आहे. या महिन्यात अनेक नवीन मॉडेल्स बाजारात दाखल होणार आहेत. मारुती ब्रेझा या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च करण्यात आला आहे. यानंतर टोयोटाच्या अर्बन क्रूझर हायरायडरवरून पडदा उचलण्यात आला. आता तिसऱ्या आठवड्यातही भारतीय बाजारपेठेत दोन कारची एंट्री होणार आहे. तर पुढील आठवड्यात Audi 8L आणि Hyundai Tucson ची एंट्री बाजारात येईल.
तसेच 12 जुलै रोजी कंपनी या लक्झरी कारच्या किमतीवरून पडदा घेणार आहे. तर 2022 Audi A8 L फेसलिफ्टमध्येही अनेक बदल पाहायला मिळतील. एक्सटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, ही कार नवीन डिझाइन केलेल्या ग्रिल्ससह येईल. याशिवाय ऑडीचे नवीन डिजिटल मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प, फॉग लॅम्प आणि अपडेटेड स्ट्रीप सराउंडही नवीन मॉडेलमध्ये उपलब्ध असतील.
Oppo Reno 8 आणि Oppo Reno 8 Pro या दिवशी भारतात होणार लॉन्च
या कारच्या आतील भागात, मागील सीटसाठी 10.1-इंचाचा अतिरिक्त इन्फोटेनमेंट डिस्प्ले दिला जाईल. जो कारला अपडेटेड MIB3 सॉफ्टवेअरसह पर्यायी परफ्यूम फंक्शन देखील मिळते. इंजिन आणि पॉवरसाठी ही कार 3.0 लीटर TFSI पेट्रोल इंजिनसह येणार आहे. यासोबतच तुम्हाला माईल्ड हायब्रीड टेकचा पर्यायही मिळतो. तर पेट्रोल इंजिन 461bhp आणि सौम्य हायब्रिड इंजिन 340bhp पॉवर जनरेट करते.
भारतात Hyundai Tucson 13 जुलै रोजी सादर केली जाणार असून. या कारची सर्व अधिकृत माहिती त्याच दिवशी प्रसिद्ध केली जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार 2.0L MPI पेट्रोल इंजिन आणि 7 सीटर लेआउट पर्यायासह येईल. याशिवाय, नवीन Tucson 2.0L CRDi डिझेल मोटरसह देखील उपलब्ध असेल. तर नवीन मॉडेलमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सही देण्यात येणार आहे. याला ADAS च्या स्वरूपात एक प्रमुख अपडेट देखील मिळेल.
मायक्रोसॉफ्टचा सरफेस लॅपटॉप गो 2 भारतात लॉन्च, किंमत किती पहा