हे 4 शेअर्स गुंतवणुकदारांना देऊ शकतात जोरदार परतावा
Buisness Batmya
गेल्या काही दिवसापासून शेअर बाजाराची सुरूवात सपाटीने होताना दिसत असून आजही शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसत आहे. सुरुवातीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेंसेक्स 310 अंकांनी घसरून 61000 च्या खाली आला आहे. तसेच, निफ्टीही 95 अंकांनी घसरून 18136 वर आली आहे. असे असतानाही कॉर्पोरेट अपडेट्सनुसार, अनेक कंपन्यांचे शेअर गुंतवणूकीचा विचार करता चांगले दिसत आहेत. त्यातच असेच 4 स्टॉक्स ब्रोकरेज फर्म शेअर खानने लॉन्ग टर्मसाठी आपल्या इन्व्हेस्टमेंट आयडियात सामील केले आहेत.
Share Market शेअर बाजारात कमजोर सुरूवात, आज या शेअर्समध्ये घसरण
Coforge वरही शेअरखानने खरेदीचा सल्ला दिला असून या शेअरची टार्गेट प्राईस 4680 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, आज या स्टॉकमध्येही घसरण दिसून आली असून हा शेअर सकाळी 3998.15 रुपयांवर ट्रेड करत होता. तर भविष्यात गुंतवणूकदारांना प्रति शेअर 682 रुपयांपर्यंचा परतावा मिळू शकतो. तसेच शेअरखानने सन फार्माला या शेअरमध्ये आज तेजी दिसून येत आहे. हा शेअर 1.08 टक्क्यांच्या उसळीसह 1020 रुपयांवर ट्रेड करताना दिसत असून गुंतवणूकदारांना भविष्यात 28 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.
या वर्षी 5 मोठे IPO बाजारात येणार, जाणून घ्या
तसेच शेअरखानने कोल इंडियाची टारगेट प्राईस 280 रुपये एवढी ठेवली असून आज हा शेअर 2.23 टक्क्यांच्या घसरणीसह 218.95 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. तर या शेअरमध्ये भविष्यात 60 रुपये अथवा 28 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.
याच बरोबर, Kotak Mahindra बँकेच्या शेअरची टार्गेट प्राईस 2250 रुपये एवढी असून आज सकाळी 10:18 वाजताच्या सुमारास, घसरणीसह 1830.75 रुपयांवर ट्रेड होता. या शेअरचा भाव 1,835 रुपये असून गुंतवणूकदारांना यात प्रति शेअर 420 रुपयांचा परतावा मिळू शकतो.
तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल- डिझेलचे दर महाग की स्वस्त? पहा