
Bussness batmya
नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 34 टक्क्यांवर पोहोचला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महागाई भत्त्यासोबतच इतर भत्तेही वाढू शकतात. या भत्त्यांपैकी सर्वात महत्त्वाचा भत्ता हा घरभाडे भत्ता आहे, घरभाडे भत्ता लवकरच वाढण्याची शक्यता आहे.मोदी सरकारने नुकतीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी दिली आहे.These employees will directly benefit Rs. 20484!
एचआरए वाढू शकतो
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता (HRA) देखील वाढू शकतो. कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. अहवालानुसार, HRA मध्ये पुढील सुधारणा 3 टक्के असेल. कमाल HRA दर 27 टक्क्यांवरून 30 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. घरभाडे भत्ता (HRA) ची श्रेणी शहरांच्या X, Y आणि Z कॅटगिरीनुसार आहे.
जे केंद्रीय कर्मचारी X श्रेणीत येतात त्यांना 27 टक्के HRA मिळतो. Y श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा HRA 18 टक्क्यांवरून 20 टक्के असेल. त्याच वेळी, झेड वर्गाचा एचआरए 9 टक्क्यांवरून 10 टक्के होईल.
DA वाढल्याने HRA मध्येही सुधारणा
नुकतीच सरकारने डीएमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता एचआरएमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.