नवीन आर्थिक वर्षात हे महत्वाचे बदल- अर्थमंत्री निर्मला सितारमण

buisness batmya
मागील काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर झाला होता. त्यात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी या अर्थसंकल्पात विविध घोषणा केल्या होत्या. तसेच काही तरतुदींची अंमलबजावणी नवीन आर्थिक वर्षात करण्यात येणार असल्याने नवीन आर्थिक वर्षात अनेक बदल पहायला मिळणार आहेत. त्यामध्ये उदाहरण द्यायचे झाले तर येत्या आर्थिक वर्षामध्ये प्रोव्हिडंट फंड (PF) च्या व्याजदरात बदल केला जाणार आहे. आणि नव्या बदलानुसार जर तुमचे पीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक योगदान असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स भरावा लागणार आहे. तसेच याबरोबरच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय पेन्शन योजना खात्यातील सरकारी योगदान 14 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तरतुद करण्यात आली आहे.These important changes in the new financial year – Finance Minister Nirmala Sitharaman
या चालु आर्थिक वर्षात क्रिप्टो करन्सीसंदर्भात सरकारने अनेक कठोर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे या नियमांची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षापासून होऊ शकते. तसेच क्रिप्टो करन्सीवर 30 टक्के टॅक्स आकारण्यात येणार असल्याने क्रिप्टोबाबतचे नियम आणखी कठोर होण्याची शक्यता आहे.तसेच एका वर्षांत दहा हजार रुपयांच्या पुढे आभासी चलनांसाठी देय रकमेवर एक टक्का एवढ्या टीडीएसची तरतुद देखील करण्यात आलेली आहे.
वाहनाचा या प्रकारातील विमा महागला vehicle insurance
येणा-या पुढील आर्थिक वर्षामध्ये पीफच्या नियमांमध्ये देखील बदल होणार आहेत. म्हणून जर तुमचे पीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक योगदान असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स भरावा लागणार आहे. तसेच एनपीएस अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये देखील काही बदल करण्यात आले आहेत. यात राष्ट्रीय पेन्शन योजना खात्यातील सरकारी योगदान म्हणून 14 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तरतुद करण्यात आली आहे.
तसेच चालू आर्थिक वर्षांच्या प्राप्तिकरात मोठे बदल करण्यात आलेले नसल्याने कराचे स्लॅब स्थिर ठेवण्यात आले आहेत.आणि करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही.त्यामुळे सुधारित विवरणपत्र सादर करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु जर काही कारणांनी ते करता नाही आल्यास संबंधित मूल्यांकन वर्षांपासून पुढील दोन वर्षांत कधीही अद्ययावत विवरणपत्र भरण्याची नवीन तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
नाशिकःजिल्ह्यात पुकारलेल्या बॅंक संपामुळे शेकडो कोटींचे व्यवहार ठप्प