उद्योग / व्यवसाय

सार्वजनिक क्षेत्रातील या दोन बँकांचे होणार खासगीकरण

Buisness Batmya

नवी दिल्ली: मोदी सरकारने आता सार्वजनिक क्षेत्रातील दोन बॅंकांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच याबाबत प्रक्रिया राबवली जोणार आहे. तसेच यासंदर्भात मोदी सरकारने अर्थसंकल्प सादर करतेवेळीच भूमिका स्पष्ट केली आहे. तर कोरोनासह अन्य आघाड्यांवरील आव्हानांमुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.These two public sector banks will be privatized

मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खाजगीकरण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, त्या दिशेने काम सुरू करण्यात आले आहे. आणि शिवाय, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड च्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी नव्याने निविदा मागवल्या जातील, अशी माहिती देण्यात आली आहे.

जर तुम्हीही या कंपन्यांचे यूझर असाल तर तुम्हालाही बसू शकतो मोठा झटका

या दोन बँकांचे खासगीकरण करण्याचा विचार

तसेच सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज या दोन बँकेचे खाजगीकरण केले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. पण निर्गुंतवणूक प्रक्रियेचा एक भाग म्हणून, कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिवांचा मुख्य गट त्यांच्या मंजुरीसाठी पर्यायी यंत्रणेकडे आपल्या शिफारसी पाठवणार आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने बीपीसीएलमधील आपला संपूर्ण ५२.९८ टक्के हिस्सा विकण्याची योजना आखली होती आणि ती मार्च २०२० मध्ये गुंतवणूकदारांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यामुळे या प्रक्रियेत नोव्हेंबर २०२० पर्यंत किमान तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. परंतु काही जणांनी त्यांच्या बोली मागे घेतल्याने फक्त एकच बोली शिल्लक राहिली. त्यामुळे आता नव्याने निविदा मागवल्या जाणार आहेत.

सर्वाधिक मायलेज देणाऱ्या सीएनजी कार, शानदार लुकसह अप्रतिम फीचर्स

 

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!